ICC World Cup Qualifier : संपूर्ण 'खान'दानाने भारतीय हॉकीला वाहून घेतलं; या पठ्ठ्यानं मात्र ओमानकडून क्रिकेट खेळत धमाका केला

ICC World Cup Qualifier Ayaan Khan
ICC World Cup Qualifier Ayaan Khanesakal
Updated on

ICC World Cup Qualifier Ayaan Khan : नेदरलँडने वनडे वर्ल्डकप क्वालिफायरच्या सुपर सिक्स फेरीत ओमानाचा 74 धावांनी पराभव केला. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात जरी ओमानचा पराभव झाला असला तरी या संघातील भारतीय वंशाच्या आयान खानने सामना स्मरणीय केला. तो ओमानकडून आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा फक्त सहावा खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे आयान खानचं अख्या खानदानाने भारतीय हॉकीसाठी वाहून घेतलेलं आहे. मात्र आयान खानने क्रिकेटची निवड केली.

ICC World Cup Qualifier Ayaan Khan
Vinesh Phogat : विनेश फोगटच्या वाढल्या अडचणी! परदेशात ट्रेनिंगसाठी नाही मिळाला व्हिसा

आयान खानने नेदलँडविरूद्धच्या सामन्यात 105 धावांची दमदार खेळी केली. त्याने ही खेळी 92 चेंडूत पूर्ण केली. यात 11 चौकार आणि 2 षटकार मारले. आयान खान सोडला तर ओमानचा दुसरा कोणताही फलंदाज अर्धशतकी मजल देखील मारू शकला नाही. आयानने भारतीय क्रिकेट वर्तुळात देखील आपली चुणूक दाखवली होती. आयान हा भारताकडून हॉकीमध्ये ऑलिम्पिक पदक पटकावणाऱ्यांपासून वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या हॉकीपटूंचा समावेश आहे.

आयानचा चुलत भाऊ असलम शेर खान हा भारताला हॉकी वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या संघाचा सदस्य राहिला आहे. याचबरोबर न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार 1936 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकीत सुवर्णपदक जिंकले होते. या संघातील अहमद शेर खान देखील आयानच्या खानदानाशी संबंधित आहेत. घरात हॉकीचा समृद्ध वारसा असताना देखील त्याने क्रिकेटची निवड दिली.

ICC World Cup Qualifier Ayaan Khan
IND vs WI: 'या' 3 खेळाडूंनी वाढवलं ​​कोच-कर्णधाराचं टेन्शन! वेस्ट इंडिजविरुद्ध Playing-11 मध्ये जागा कोणाला?

आयान मध्य प्रदेशकडून खेळलाय

आयानने विविध वयोगटात मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व केलं होतं. त्याला 2015 - 16 मध्ये स्थानिक हंगामात वरिष्ठ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये देखील पदार्पण केले होते. तो व्यंकटेश अय्यर सोबत देखील खेळलाय.

आयान खानला मध्य प्रदेशकडून जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने क्रिकेटमध्येच कारकीर्द करण्यासाठी ओमानकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने तीन वर्षे ओमानमध्ये स्थानिक क्रिकेट खेळले. त्यानंतर कूलिंग ऑफ पीरियड संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले.

त्याने आतापर्यंत 33 वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने 971 धावा आणि 27 विकेट्स घेतल्या आहेत. तर 11 टी 20 सामन्यात त्याने 124 धावा करत 2 विकेट्स घेतल्या आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.