Babar Azam : पाऊस पडला मात्र... भारतातील पहिल्याच सामन्यात कसा खेळला बाबर?

Babar Azam 1st Match In India
Babar Azam 1st Match In Indiaesakal
Updated on

Babar Azam 1st Match In India : भारतातील 13 व्या वनडे वर्ल्डकपसाठी पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाला आहे. तब्बल 7 वर्षांनी पाकिस्तानी संघ भारतात सामने खेळणार आहे. कर्णधार बाबर आझम तर पहिल्यांदाच भारतात खेळणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचा स्टार फलंदाज भारतात कशी कामगिरी करतो याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

हैदराबादमध्ये दाखल झाल्यानंतर पाकिस्तान आज न्यूझीलंडविरूद्ध सराव सामना खेळत आहे. गेल्या वर्ल्डकपमधील उपविजेत्या न्यूझीलंडविरूद्धचा हा सामना पाकिस्तानसाठी सरावाची एक उत्तम संधी आहे.

Babar Azam 1st Match In India
Asian Games 2023 : बॅडमिंटनमध्ये भारताने इतिहास रचला, तब्बल 37 वर्षांनी येणार पदक

आजच्या या सराव सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना काही काळ थांबवावा लागला होता. जरी पाकिस्तानच्या फलंदाजीवेळी पावसाने हजेरी लावली असली तरी त्याचा परिणाम पाकिस्तानच्या फलंदाजीवर झाला नाही.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने 84 चेंडूत 80 धावांची खेळी करत पाकिस्तानला 150 धावांच्या पार पोहचवले. या खेळीत बाबरने 2 षटकार आणि 8 चौकार मारले. बाबर आझम पाठोपाठ मोहम्मद रिझवानने देखील दमदार खेळी करत 94 चेंडूत 103 धावा चोपल्या. त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले.

Babar Azam 1st Match In India
Virender Sehwag : दबाव टाळायचा असेल तर... धोनी - कर्स्टनचे उदाहरण देत विरूने रोहित सेनेला दिला मोलाचा सल्ला

या दोघांनी पाकिस्तानला 40 षटकात 250 च्या जवळ नेऊन पोहचवले होते. या दोघांव्यतिरिक्त सौद शकीलनेही चांगली फलंदाजी करत नाबाद 36 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने दोन तर मॅट हेन्रीने एक विकेट घेतली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन दुखापतीतून अजून सावरला नसल्याने पहिला सराव सामना खेळला नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.