ICC Ranking : भारतीय वनडे संघाचा काळजीवाहू कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) आयसीसी वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI Ranking) 13 व्या स्थानावर पोहचला आहे. शिखर धवनने वेस्ट इंडीज विरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 97 धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली होती. याचबरोबर पाठोपाठ दोन अर्धशतकी खेळी करणारा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) देखील 20 स्थानांची उसळी घेत संयुक्तरित्या 54 व्या स्थानावर पोहचला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) कसोटी रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. याबरोबरच तो आयसीसीच्या तीनही क्रिकेट प्रकारात पहिल्या तीनमध्ये पोहचणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तो वनडे आणि टी 20 रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराज याला देखील पहिल्या 100 जणांमध्ये स्थान मिळाले आहे. तो आता 97 व्या स्थानावर आला आहे. त्याने विंडीजविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 57 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या. कसोटी रँकिंगमध्ये पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मागे टाकले. आफ्रिदी आता 836 गुण घेत तिसऱ्या स्थानावर पोहचला. जसप्रीत बुमराह 828 गुण मिळवत चौथ्या स्थानावर घसरला आहे.
दुसरीकडे वेस्ट इंडीज दौऱ्यावर विश्रांती देण्यात आलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वनडे रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. विराट पाचव्या तर रोहित सहाव्या स्थानावर घसरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.