Babar Azam Breaks Virat Kohli Record: वेस्ट इंडिजचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला असून दोन्ही संघात प्रत्येकी तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ सोमवारी पाकिस्तानात पोहोचला आहे. बुधवारी यादोन्ही संघामध्ये पहिला वनडे सामना खेळला जाईल. वेस्ट इंडिजचा संघ यावेळी त्यांचा नवा कर्णधार निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
वेस्ट इंडिजने गेल्या 31 वर्षात पाकिस्तानविरुद्ध एकही वनडे मालिका जिंकली नाही. अशा वेळेस इंडिजला इतिहास रचण्याची संधी आहे. वेस्ट इंडिजशिवाय पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमलाही या मालिकेत इतिहास रचण्याची संधी आहे. बाबर या मालिकेत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडू शकतो.
बाबर आझमने जर या एकदिवसीय मालिकेत 98 धावा केल्या तर कर्णधार म्हणून सर्वात लवकर 1000 धावा करणारा फलंदाज बनले. बाबर आझमने हे केलं तर विराटचा विक्रम मोडल्या जाईल. कोहलीने कर्णधार म्हणून वनडेमध्ये सर्वात लवकर 1000 धावा केल्या आहेत, त्यासाठी त्याला 17 डाव लागले. बाबरने आतापर्यंत 12 डावात एकूण 902 धावा केल्या आहेत. बाबरला आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत विराटचा विक्रम मोडण्याची संधी असेल.
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ८ जून रोजी होणार आहे. दुसरा 10 जून तर तिसरा 12 जून रोजी होणार आहेत. याआधी पाकिस्तानने तीन सामन्यांच्या T20I मालिकेत वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला होता. पाकिस्तानसाठी बाबर आझमला घरच्या भूमीवर पुन्हा मालिका जिंकण्याची संधी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.