Pakistan Team : शाहीद आफ्रिदीचा जावई झाला पाकिस्तानचा टी-20 कर्णधार, तर या खेळाडूकडे कसोटीत नेतृत्वाची धुरा...

Babar Azam Resignation After PCB appoints Shaheen Afridi as Pakistan T20I captain Shan
Babar Azam Resignation After PCB appoints Shaheen Afridi as Pakistan T20I captain Shansakal
Updated on

Pakistan Team : एकदिवसीय वर्ल्ड कप-2023 मधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान संघावर बरीच टीका होत आहे. या वेळीही हा संघ उपांत्य फेरीत जाऊ शकला नाही. यानंतर संघाचा कर्णधार बाबर आझमवर जोरदार टीका झाली आणि त्याने तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टी-20 आणि कसोटी संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीकडे टी-20 आणि शान मसूदकडे कसोटीचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर वनडे संघाच्या कर्णधाराबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Babar Azam Resignation After PCB appoints Shaheen Afridi as Pakistan T20I captain Shan
Babar Azam Resigns : बाबरशाही संपली! वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर कर्णधारपदाचा दिला राजीनामा

एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर बाबर आझमला कर्णधारपद सोडावे लागेल, असे मानले जात होते. तेव्हापासून कर्णधार म्हणून शाहीन आफ्रिदीचे नाव पुढे येत होते. या वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करणारा शाहीन हा एकमेव पाकिस्तानी खेळाडू होता.

त्याने यापूर्वी पीएसएलमध्ये लाहोर कलंदर संघाचे नेतृत्व केले आहे. आणि आपल्या संघाला चॅम्पियन बनवले आहे. अशा परिस्थितीत त्याला टी-20चा कर्णधार बनवणे हा योग्य निर्णय मानला जात आहे. मोहम्मद रिझवानही कर्णधारपदाच्या शर्यतीत सामील होता, मात्र त्याला ही जबाबदारी देण्यात आलेली नाही.

Babar Azam Resignation After PCB appoints Shaheen Afridi as Pakistan T20I captain Shan
Mohammed Shami : आजपर्यंत एकाही भारतीय गोलंदाजाला जे जमलं नाही ते शामीनं करून दाखवलं

पाकिस्तानचा नवा कसोटी कर्णधार शान मसूदचे नाव आधीपासून चर्चेत नव्हते, मात्र त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. 34 वर्षीय मसूद हा डावखुरा फलंदाज असून त्याने पाकिस्तानसाठी 30 कसोटी सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 28 च्या सरासरीने 1597 धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याचे कसोटी संघातील स्थान निश्चित झाले नव्हते, मात्र त्याच्याकडे अचानक संघाची कमान देण्यात आली आहे. आता त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कशी कामगिरी करतो हे पाहायचे आहे.

पाकिस्तान क्रिकेटमध्ये नेहमीच राजकारणाचे वर्चस्व राहिले आहे. अशा परिस्थितीत शाहीन आफ्रिदी कर्णधार बनल्यानंतर संघात इतरही अनेक बदल होऊ शकतात. पाकिस्तानच्या कोचिंग स्टाफ आणि निवड समितीमध्ये बदल होणार हे नक्की. कोचिंग स्टाफ एनसीएकडे पाठवण्यात आला असून लवकरच नवीन प्रशिक्षकाची घोषणा केली जाईल. त्याचबरोबर नवीन निवड समितीही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.