Babar Azam : बाबर बोलला! ... म्हणून मी शेवटचं षटक नवाझला दिलं होतं

Babar Azam Reveal Why He Gave  Mohammad Nawaz Last Over
Babar Azam Reveal Why He Gave Mohammad Nawaz Last OverESAKAL
Updated on

Babar Azam Reveal Why He Gave Mohammad Nawaz Last Over :

मेलबर्न : पाकिस्तानचे 160 धावांचे आव्हान भारताने सामन्याच्या शेवटच्या षटकात पार करत टी 20 वर्ल्डकप 2022 ची विजयी सुरूवात केली. भारताकडून विराट कोहलीने आयुष्यातील आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी केली. त्याने 53 चेंडूत नाबाद 82 धावा चोपल्या. त्याला हार्दिक पांड्याने 40 धावांची खेळी करून चांगली साथ दिली. पांड्याने गोलंदाजीत देखील चमक दाखवत 30 धावात 3 बळी टिपले होते. दरम्यान, शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 16 धावा हव्या होत्या. त्यावेळी बाबर आझमने चेंडू डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाझच्या हातात दिला. यावर क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र बाबर आझमने असे का केले हे सामना झाल्यानंतर स्पष्ट केले.

Babar Azam Reveal Why He Gave  Mohammad Nawaz Last Over
Virat Kohli : सर्वोत्तम इनिंग! पांड्याने दिला खास सल्ला, कोहलीची कारकिर्दितील 'विराट' खेळी

बाबर आझम सामना झाल्यावर म्हणाला की, 'आमच्या गोलंदाजांनी खरोखर चांगला मारा केला. मी विजयाचं सर्व श्रेय विराट कोहली आणि हार्दिक पांड्याला देतो. नवीन चेंडूवर मेलबर्नवर धावा करणे सोपे नाही. आम्ही देखील 10 षटकानंतर भागीदारी रचली. आम्हीला जिंकण्याची चांगली संधी होती. आम्ही आमच्या योजनेनुसार खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या विजयाचा सर्व श्रेय विराट कोहलीला जातं.'

दरम्यान, बाबर आझमने शेवटचे षटक टाकण्यासाठी मोहम्मद नवाझला का राखून ठेवण्यात आले याबाबत देखील खुलासा केला. बाबर म्हणाला की,'आम्ही मधल्या षटकात ठरवले होते की आम्हाला विकेट हवी आहे. त्यामुळे आम्ही वेगवान गोलंदाज वापरले आणि फिरकीपटू शेवटीसाठी राखून ठेवला. या सामन्यात आमच्यासाठी अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. ज्या प्रकारे इफ्तिकार आणि शान मसूद खेळले ही गोष्ट आमच्यासाठी सकारात्मक आहे.'

Babar Azam Reveal Why He Gave  Mohammad Nawaz Last Over
Rohit Sharma : 'इथं' फिरला सामना! पाकवरील थरारक विजयानंतर रोहितची प्रतिक्रिया

विराट कोहलीने स्लॉग ओव्हरमध्ये आपला गिअर बदलला. त्याने फटकेबाजी सुरू करत 19 वे षटक टाकणाऱ्या हारिस रौऊफला सलग दोन षटकार मारत सामना 6 चेंडूत 16 धावा असा आणला. मात्र हार्दिक पांड्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. तो 36 चेंडूत 40 धावा करून माघारी परतला. त्यानंतर कार्तिकने 1 तर विराटने 2 धावा करून सामना 3 चेंडूत 13 धावा असा आणला.

मात्र नवाझने नो बॉल टाकत भारताला विजयाची संधी निर्माण करून दिली. विराटने नो बॉलवर षटकार मारत सामना 3 ला 6 धावा असा आणला. पुढचा चेंडू नवाझने वाईड टाकला त्यामुळे सामना 3 चेंडूत 5 धावा असा होता. नवाझने विराटला बोल्ड केले मात्र नो बॉल असल्याने सामना 2 चेंडूत 2 धावा असा आणला. स्ट्राईकवर असलेल्या दिनेश कार्तिक स्टम्पिंग आऊट झाला. भारताला आता 1 चेंडू आणि 2 धावांची गरज होती. नवाजने वाईड टाकत सामना भारताच्या खिशात टाकला. विजयासाठी 1 धावेची गरज असताना अश्विनने चौकार मारत विजय साकारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.