Babar Azam : पाकिस्तान संघात मोठा भूकंप! वर्ल्ड कपनंतर बाबर आझम कर्णधारपदाचा देणार राजीनामा

Babar Azam set to step down from white-ball captaincy after World Cup 2023
Babar Azam set to step down from white-ball captaincy after World Cup 2023
Updated on

Babar Azam set to step down from white-ball captaincy after World Cup 2023 : भारतात सुरू असलेला आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 पाकिस्तान क्रिकेट संघासाठी खुपच खराब राहिला आहे. पाकिस्तान आज इंग्लंडविरुद्ध कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये खेळणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला खूप टीकेला सामोरे जावे लागले. कारण त्यांची कामगिरी यावेळी काही विशेष राहिली नव्हती.

पाकिस्तानने आतापर्यंत 8 पैकी केवळ 4 सामने जिंकले असून त्यामुळे ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत.

Babar Azam set to step down from white-ball captaincy after World Cup 2023
IND vs NED : प्रयोग करायची ही वेळ नाही, नेदरलँड्सविरुद्ध भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी खेळणार

जर पाकिस्तानला उपांत्य फेरीसाठी पात्र ठरायचे असेल तर त्यांना आज इंग्लंडला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. तो मोठा फरकही अशक्य वाटत आहे. मात्र, या सगळ्या दरम्यान पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम वर्ल्ड कपनंतर आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे.

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, बाबर आझमने त्याच्या जवळच्या लोकांशी आणि पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू रमीझ राजा यांच्याशी कर्णधारपदाबद्दल चर्चा केली आहे.

बाबर आझम आपल्या जवळच्या लोकांचा सल्ला घेऊन कर्णधारपद सोडणार की नाही याचा निर्णय घेतील. मात्र, त्याच्या जवळच्या काही लोकांनी त्याला खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडण्यास सांगितले आहे.

बाबर आझमसाठी 2023 चा वर्ल्ड कप काही खास नव्हता. त्याने 8 सामन्यात केवळ 282 धावा केल्या आहेत. मात्र, बाबर पाकिस्तानी संघाचा कर्णधार राहणार की नाही हे लवकरच कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.