Pakistan Cricket : पाकिस्तान किक्रेटमध्ये राडा! PCB प्रमुखांनी बाबरचे Whatsapp चॅट केलं लीक

Babar Azam Whatsapp Chats Leaked PCB Chairman Zaka Ashraf Ignites Controversy
Babar Azam Whatsapp Chats Leaked PCB Chairman Zaka Ashraf Ignites Controversysakal
Updated on

Babar Azam Whatsapp Chats Leaked PCB Chairman Zaka Ashraf Ignites Controversy : पाकिस्तान क्रिकेटमध्ये अजूनही गोंधळ कायम आहे. आधी बाबर आझम आर्मीला गेल्या 5 वर्षांपासून पगार मिळालेला नाही, अशी बातमी पाकिस्तानी मीडियामध्ये आली होती.

आता थेट पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, झका अश्रफ यांनी रविवारी थेट टीव्हीवर बाबर आझमचे चॅट लीक केले आहेत. रशीद लतीफ यांच्या आरोपांना उत्तर देताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांनी हे कृत्य केले.

Babar Azam Whatsapp Chats Leaked PCB Chairman Zaka Ashraf Ignites Controversy
World Cup 2023 : ICC चा 'तो' निर्णय अन् इंग्लंड फक्त वर्ल्ड कपच नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर?

झका अश्रफ बाबर आझमकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, बाबरला सतत त्याच्याशी संपर्क साधात आहे पण झका याकडे लक्ष देत नाहीये. हा आरोप पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक आणि कर्णधार राशिद लतीफने शनिवारी केला होता.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत झका अश्रफ यांनी या गोष्टी फेटाळून लावल्या. आणि म्हणाले की, पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधाराने कधीही त्याच्याशी वैयक्तिक बोलण्याचा प्रयत्न केला नाही.

Babar Azam Whatsapp Chats Leaked PCB Chairman Zaka Ashraf Ignites Controversy
Ratan Tata: क्रिकेट खेळाडूंना दंड, बक्षिसाबाबत रतन टाटांचं स्पष्टीकरण; म्हणाले, मी ICCला...

बाबरशी आपण अजिबात बोललो नाही, अशी कबुली अशरफने दिली. यानंतर त्याने मुलाखतकारासह व्हॉट्सअॅपचा एक लांबलचक मेसेज देखील शेअर केला, जी बाबर आणि पीसीबी सीओओ सलमान नसीर यांच्यातील संपूर्ण संभाषण होती. जाकाने असे करण्यामागचा उद्देश हा होता की बाबरने त्याला कॉल किंवा मेसेज केला नाही.

मात्र, हे मेसेज टीव्हीवर लाइव्ह दाखविण्यात आल्याची बाबरला माहिती आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संपूर्ण प्रकरणाला गांभीर्याने घेत माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू अझहर अलीने म्हटले आहे की, पीसीबी प्रमुख किंवा कार्यक्रमातील लोकांनी बाबरला त्याचे संदेश लाइव्ह टीव्हीवर दाखवले जात असल्याचे सांगितले होते का, याची चौकशी झाली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.