Babar Azam : ''पाकिस्तान जिंकल्यास 2048 मध्ये बाबर पाकचा प्रधानमंत्री''

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणारा पाकिस्तानचा संघ, यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर जाता जाता....
Babar Azam Pakistan's Prime Minister
Babar Azam Pakistan's Prime Ministersakal
Updated on

Babar Azam Pakistan's Prime Minister : "बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणारा पाकिस्तानचा संघ, यंदाच्या ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर जाता जाता अंतिम फेरीत पोहचला आहे. ऑस्ट्रेलियामधील १९९२ मध्ये खेळवल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वकरंडकातसुद्धा त्यांचा संघ असाच शर्यतीतून बाहेर जाणार होता, मात्र शेवटच्या साखळी सामन्यात विजय मिळवल्याने ते उपांत्य आणि नंतर अंतिम फेरीत पोहचू शकले.

Babar Azam Pakistan's Prime Minister
PAK vs ENG Final: मेलबर्नवरील पाऊस पाहता ICC ने उचलले मोठे पाऊल; आता सामना...

सध्या सुरू असणाऱ्या विश्वकरंडकामध्ये आणि १९९२ च्या स्पर्धेमध्ये बरेच साम्य असून आता जर पाकिस्तानचा संघ विजयी झाला, तर बावर आझम पुढे जाऊन इम्रान खानप्रमाणे देशाचा प्रधानमंत्री होईल," असा टोला भारताचे दिग्गज कसोटी फलंदाज सुनील गावसकर यांनी लगावला आहे. 'इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या संघाने १९९२ मधील एकदिवसीय विश्वकरंडक जिंकण्याची किमया साधली होती. त्यानंतर बरोबर २६ वर्षांनी ते पाकिस्तानचे प्रधानमंत्री झाले, त्यामुळे असेच बाबर बाबतीतसुद्धा घडू शकते, असे गावसकर यांनी म्हटले आहे.

Babar Azam Pakistan's Prime Minister
FIFA World Cup : विश्वकरंडकासाठी अर्जेंटिनाचा संघ जाहीर

'इम्रान यांच्या खांद्यावर १९९२ मध्ये पाकिस्तानच्या संघाची धुरा होती आणि त्यांनी विश्वकरंडक जिंकला होता. तेव्हासुद्धा भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. डावखुरा जलदगती गोलंदाज वसिम आक्रमने १९९२ मधील स्पर्धेत देशातर्फे सर्वांत जास्त गडी टिपले होते, या स्पर्धेतसुद्धा डावखुरा जलदगती गोलंदाज असणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीने संघातर्फे सर्वांत जास्त गडी बाद केले आहेत. या दोन्ही स्पर्धात अविस्मरणीय साम्य आढळते' असेही गावसकर पुढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.