Saina Nehwal: बुमराह माझ्या स्मॅशसमोर टिकू शकणार नाही! सायना नेहवालची क्रिकेटवरील कमेंट पुन्हा चर्चेत

Saina Nehwal on Cricket: सायना नेहवालने क्रिकेट आणि इतर खेळांच्या तुलनेबाबत मोठं भाष्य केलं आहे.
Saina Nehwal | Jasprit Bumrah
Saina Nehwal | Jasprit BumrahSakal
Updated on

Saina Nehwal on Comparison with Cricket: सायना नेहवाल गेल्या काही दिवसांपासून तिच्या वेगवेगळ्या विषयांवरील वक्तव्यामुळे चर्चेत आहे. आता तिने नुकतेच खेळांच्या तुलनेबाबत मोठे भाष्य केले आहे. खरंतर यापूर्वीही तिने क्रिकेटबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरून बरीच चर्चाही झालेली, त्यावर केलेल्या कमेंटमुळे क्रिकेटपटू अंगक्रिश रघुवंशीला माफीही मागावी लागली होती.

नक्की काय झालेलं?

झाले असे होते की सायनाने एका पॉडकास्टमध्ये म्हटले होते की 'क्रिकेटबद्दल माझं एक मत आहे, जर तुम्ही बॅडमिंटन, बास्केटबॉल, टेनिस आणि नक्कीच अन्य खेळांना पाहिले तर ते अधिक कठीण आहेत.'

'तुम्हाला शटल उचलून सर्व्ह करायलाही वेळही नसतो. तुम्हाला २० सेकंदमध्ये शटल उचलून सर्व काही करायचे असते आणि त्यावेळी तुम्ही जोर-जोरात श्वास घेत असता. क्रिकेटसारख्या खेळाकडे जास्त लक्ष वेधलं जातं, जिथं कौशल्य महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं.'

Saina Nehwal | Jasprit Bumrah
Saina Nehwal: सायनाच्या वक्तव्यावर KKR च्या युवा क्रिकेटरची वादग्रस्त कमेंट अन् मग मागावी लागली माफी, नक्की भानगड काय?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.