आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आशेचा ‘किरण’

bajaj-allianz-pune-half-marathon Kiran Mhatre from Parbhani Farmer Family
bajaj-allianz-pune-half-marathon Kiran Mhatre from Parbhani Farmer Family
Updated on

पुणे  - आभाळ कोसळले... कितीही कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला तरी खेळ जगण्याची नवी उमेद आणि जिद्द देतो, याची खात्रीच परभणीच्या शेतकरी कुटुंबातील किरण म्हात्रेची कामगिरी पाहिल्यावर येते. वडिलांची आत्महत्या, आईचे निधन, जगण्याची उमेद देणाऱ्या आजोबांनीही सोडलेली साथ, अशा प्रतिकूल परिस्थितीत या म्हात्रे कुटुंबीयांसाठी किरणची मॅरेथॉनमधील धावाधाव आशेचा ‘किरण’ दाखवणारी ठरत आहे.

परभणीच्या त्रिधरावाडीत राहणारा किरण म्हात्रे अठराविश्‍व दारिद्य्रच्या व्यथा पुणे मॅरेथॉनमध्ये तिसरा क्रमांक मिळवल्यानंतर मांडत होता. लहानपणापासून एकापाठोपाठ एक धक्के बसले, तरी तो हिंमत हरला नाही. गरिबीमुळे वडिलांनी आत्महत्या केली. त्या धक्काने आईचेही निधन झाले. त्या वेळी किरण दोन वर्षांचा होता. आपल्यावर किती मोठे आकाश कोसळले आहे, त्याची त्याला समजही नव्हती.

एक-दोन एकरांच्या जमिनीतील तुकड्यात शेतीत येणारे अपयश किरणला आई-वडिलांपासून कायमचे दूर करणारेच नव्हते, तर त्याच्या आजोबांनाही आत्महत्येचे पाऊल उचलण्यास भाग पाडणारे होते. त्या वेळी किरण पाच वर्षांचा होता.

घरात मोठा भाऊ काय होईल तेवढी शेती करतो. पण, त्यातून काहीही मिळत नाही. आजी आणि लहान बहिणींचा उदरनिर्वाह कसा करायचा, यासाठी किरणला मॅरेथॉन धावण्याचा ‘किरण’ सापडला. शाळेत असताना शिक्षकांना किरणमधील धावण्याच्या क्षमतेची ओळख झाली आणि त्याला प्रेरणा दिली. किरण आत्ता १७ वर्षांचा आहे. तो प्रथमच पुणे मॅरेथॉनमध्ये धावला आहे. पण, या लहान वयातच हैदराबाद, दिल्ली, औरंगाबाद, नाशिक येथील मॅरेथॉन शर्यतीचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. आज मी तिसरा आलो, याची खंत नाही. मी माझे सर्वोत्तम दिले. शिवाय, आत्तापर्यंतची ही माझी सर्वोत्तम वेळ होती. याचे समाधान मिळाले, असे किरणने सांगितले. 

बालेवाडी pune half marathon पुणे मॅरेथॉन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.