Bajrang Punia : बजरंग पुनियाच्या अडचणी वाढल्या; NADA ने पुन्हा केलं निलंबित

Wrestling : बजरंग पुनियावर नाडाने दुसऱ्यांदा का केली निलंबनाची कारवाई, याच्या त्याच्यावर काय होणार परिणाम?
Bajrang Punia
Bajrang Punia Suspensions esakal
Updated on

Bajrang Punia Suspensions : भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (NADA) त्याला पुन्हा एकदा निलंबित केलं आहे. नाडाच्या अँटी डिसिप्लिनरी डोपिंग समितीने बजरंग पुनियाविरूद्धचं निलंबन मागं घेतलं होतं. मात्र तीन आठवड्यातच नाडाने पुन्हा त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पुनियाला सर्वात आधी 23 एप्रिलला डोपिंग टेस्टसाठी लघवीचे नमुने देण्याबाबत नाडासोबत सहकार्य न केल्यानं कारवाई करण्यात आली होती.

Bajrang Punia
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या सेमीफायनलच्या आशांवर पडणार पावसाचं पाणी? भारताविरुद्धच्या सामन्यावेळी असे आहेत हवामान अंदाज

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार नाडाने बजरंगला कळवले की, 'नाडाच्या अँटी डोपिंग नियम 2021मधील कलम 2.3 चे उल्लंघन केल्या प्रकरणी तुम्हाला ही अधिकृत नोटीस पाठवण्यात येत आहे. तुम्हाला तातपुरतं निलंबित करण्यात येत आहे.'

नाडाने स्पष्टपणे अँटी डोपिंगच्या नियमांचे उल्लंघन असा उल्लेख केला आहे. याचा अर्थ या काळात झालेल्या बजरंगच्या कुस्ती स्पर्धांमधील सर्व निकाल हे रद्द होणार आहेत. याचा परिणाम बजरंगने या काळात जिंकलेल्या सर्व पदक, पॉईंट्स आणि बक्षीसांवर होणार आहे.

Bajrang Punia
IND vs BAN, Video: ऋषभ पंतला मिळालं नवं टोपन नाव, फिल्डिंग मेडल सोहळ्यात दिग्गज विव रिचर्ड्सनेच केलं जाहीर

पुनियाला का केलं निलंबीत?

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या बजरंगवर निलंबनाची कारवाई ही 23 एप्रिल रोजी करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्यावर 18 एप्रिल रोजीच्या त्याचा ठावठिकाणा सांगण्याच्या नोटिशीला उत्तर देऊ शकला नसल्याने ही कारवाई करण्यात आली होती.

याविरूद्ध बजरंगने नाडाच्या अधिकांऱ्यांवर एक्सपायरी झालेले किट त्याचे लघवीचे नमुने घेण्यासाठी दिल्याचा आरोप केला होता. 25 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत मिशन ऑलिम्पिक सेलने बजरंगच्या सरावासाठी 8 लाख 82 हजार रूपये मजूर केले होते. तो 28 मे पासून रशियात सराव करणार होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.