Bajrang Punia Kisan Mahapanchayat : शेतकऱ्यांच कुरूक्षेत्र! बजरंग पुनियाही पोहचला किसान महापंचायतीत

Bajrang Punia Kisan Mahapanchayat
Bajrang Punia Kisan Mahapanchayat esakal
Updated on

Bajrang Punia Kisan Mahapanchayat : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्धच्या आंदोलनात शेतकरी नेत्यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. ते त्यांच्या बाजूने खंबीर उभे होते. आता कुस्तीपटूंनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

Bajrang Punia Kisan Mahapanchayat
World Cup 2023 India Vs Pakistan : या दिवशी भारत - पाकिस्तान भिडणार; अंस असेल भारताचं संभाव्य शेड्युल

कुस्तीपटू बजरंग पुनिया कुरूक्षेत्रवर सुरू असलेल्या किसान महापंचायतीमध्ये सहभागी होण्यासाठी पोहचला. यावेळी त्याने एएनआयशी बोलताना सांगितले की, 'आम्ही इथं शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. आम्ही देखील शेतकरी कुटुंबातूनच येतो. जे शेतकरी रस्त्यावर उभे आहेत. त्यांच्या पाठीशी आम्ही आम्ही उभे आहोत.'

बजरंग पुढे म्हणाला की, 'आम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळी देखील शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता. आम्ही त्यांना कायम पाठिंबा देत राहणार.'

हरियाणामध्ये शेतकऱ्यांनी शेतीमालाला किमान आधारभूत किंमत (MSP) मिळावी यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. शेतकऱ्यांनी आत कुरूक्षेत्रमध्ये महापंचायत बोलवली आहे. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत हे देखील या महापंचायतीत सामील होत आहेत. राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्चचा निषेध केला. याचबरोबर त्यांनी एमएसपी गॅरेंटीसाठी संपूर्ण देशात आंदोलन होणार असल्याचे सांगितले. त्यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत पुढं कोणतं पाऊल उचलणार हे देखील स्पष्ट केले.

Bajrang Punia Kisan Mahapanchayat
WTC Final 2023 ICC Fined : ट्रॉफी जिंकली नाहीच मात्र आता भला मोठा दंडही द्यावा लागणार... ICC ने दिला दणका

राकेश टिकैत म्हणाले की, 'बैठकीवर सर्वांची नजर आहे. हा प्रश्न देशातील सर्व पिकांच्या एमएसपीचा आहे. ज्या प्रकारची घटना इथं झाली आहे ती चुकीची आहे. एमएसपी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर काठ्या चालवल्या गेल्या.' टिकैत यांनी माध्यमांवर शेतकरी नेत्यांना बदनाम केल्याचा आरोप केला. यातबरोबर त्यांनी अटक झालेल्या शेतकऱ्यांना सोडण्याची देखील मागणी केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.