Bajrang Punia: बजरंग पुनिया निलंबन प्रकरणाला नवं वळण; भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून परदेशात ट्रेनिंगसाठी निधी मंजूर, मात्र...

Bajrang Punia: बजरंग पुनियाने उत्तेजक नमुना चाचणीला नकार दिल्याने त्याच्यावर नाडानंतर जागतिक कुस्ती संघटनेकडूनही निलंबनाची कारवाई झाली आहे.
Bajrang Punia
Bajrang PuniaX/WeAreTeamIndia
Updated on

Bajrang Punia: भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या त्याच्या आशेला सुरूंग लागला होता. त्याला राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटनेकडून (नाडा) 23 एप्रिलला निलंबित करण्यात आले होते.

त्याने उत्तेजक नमुना चाचणीला नकार दिल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान आता जागतिक कुस्ती संघटनेकडूनही त्याच्यावर 2024 च्या अखेरीपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

आशियाई ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी सोनीपत येथे 10 मार्च रोजी घेण्यात आलेल्या निवड चाचणीत तो पराभूत झाला होता. त्यानंतर तो लगेचच निघून गेल्याचे सांगण्यात आले. त्याने नाडाला उत्तजक चाचणीसाठी नमुनाही दिला नाही. त्यामुळे त्याच्यावर नाडाने बंदी घातली.

Bajrang Punia
Sanjiv Goenka: आठ वर्षांपूर्वी धोनीबरोबर संजीव गोयंकांनी जे केलं, तेच केएल राहुलसोबतही होणार?

आता यानंतर त्याच्यावर जागतिक कुस्ती संघटनेने देखील बंदी घातल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बजरंगने जागतिक कुस्ती संघटनेकडून कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले आहे.

मात्र जागतिक कुस्ती संघटनेमधील त्याच्या प्रोफाईलवर माहिती देण्यात आली आहे की ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत त्याला निलंबित केले आहे. त्याने उत्तेजक चाचणीच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

बजरंगने उत्तेजक चाचणी न देण्याचे कारण सोशल मीडियावर स्पष्ट केले होते. त्याने सांगितले होते की नमुना चाचणी घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांशी त्याचे बोलणे झाले होते, त्यांनी नमुना घेण्यासाठी मुदतबाह्य किट आणले होते.

याचदरम्यान, अशीही माहिती समोर आली की नाडाने जरी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली असली, तरी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने त्याला परदेशातील ट्रेनिंगसाठी आर्थिक मदत मंजूर केली आहे.

Bajrang Punia
IPL 2024: 'रोहित पुढच्या वर्षी मुंबई इंडियन्स सोडेल...', वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी; कोणत्या संघाकडून खेळावं हेही सांगितलं

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार मिशन ऑलिम्पिक सेलची 25 एप्रिलला बैठक झाली, ज्यांनी दागेस्तान, रशिया येथे 28 मे पासूनच्या त्याच्या ट्रेनिंगला मंजूरी दिली आहे. यासाठी जवळपास 9 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

खरंतर तो 24 एप्रिलला ट्रेनिंगसाठी जाणार होता. पण त्याला पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळवण्यासाठी आलेल्या अपयशानंतर आणि त्याने ही ट्रेनिंग पुढे ढकलली. दरम्यान, त्याच्याबरोबर ट्रेनिंगसाठी जायला त्याचे कंडिशनिंग कोच काजी किरण मुस्तफा हसन यांचा कार्यकाळही मेच्या अखेरीपर्यंत वाढवण्यात आला होता.

दरम्यान, आता अशी माहिती मिळत आहे की बजरंगने हा ट्रेनिंग दौरा रद्द केला आहे. त्याने म्हटले आहे की 'भारतीय क्रीडा प्राधिकरणाने हे मंजूर केले, हे पाहून मी चकीत झालो. मी खरंतर माझी योजना रद्द केली आहे, मी कुठेही सध्या ट्रेनिंगसाठी नाही जात.'

याशिवाय त्याने असेही सांगितले आहे की त्याच्या वकिलांनी नाडाला उत्तर दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.