India Wrestler Protest : बजरंग, विनेश, साक्षीची न्यायालयात धाव ; कुस्ती संघटनेच्या निवड चाचणीला स्थगिती मिळण्यासाठी पुढाकार

भारतीय कुस्ती संघटनेकडून घेण्यात येणाऱ्या निवड चाचणीला स्थगिती मिळावी, यासाठी बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक व तिचा पती सत्यवर्त कडियन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
India Wrestler Protest
India Wrestler Protestsakal
Updated on

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती संघटनेकडून घेण्यात येणाऱ्या निवड चाचणीला स्थगिती मिळावी, यासाठी बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक व तिचा पती सत्यवर्त कडियन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी उद्या (ता. १ मार्च) होणार आहे.

पुढील महिन्यात किर्गीस्तान येथे आशियाई कुस्ती अजिंक्यपद ऑलिंपिक पात्रता फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नवी दिल्लीतील आयजी स्टेडियममध्ये निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे. या चाचणीतून ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी भारतीय कुस्ती संघाची निवड करण्यात येणार आहे. याप्रसंगी बजरंग पुनिया म्हणाला, मी रशिया येथे सराव करीत आहे. निवड चाचणीला सहभागी व्हायचे आहे, म्हणूनच मी सरावावर ३० लाख रुपये खर्च केले आहेत; पण ज्या कुस्ती संघटना केंद्रीय सरकारकडून निलंबनाची शिक्षा भोगत आहे, त्यांच्याकडून निवड चाचणीची घोषणा कशी काय करण्यात येऊ शकते? केंद्र सरकार याबाबत शांत का आहे? सरकार किंवा ॲड हॉक समितीकडून निवड चाचणी घेण्यात आल्यास मी सहभागी होईन. निलंबित संघटनेकडून घेण्यात आलेल्या चाचणीत सहभागी होणार नाही.

केंद्र सरकारकडून मौन

जागतिक कुस्ती संघटनेकडून भारतीय कुस्ती संघटनेवरील निलंबन मागे घेण्यात आले आहे. मात्र, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून अद्याप निलंबन मागे घेण्यात आलेले नाही. जागतिक कुस्ती संघटनेला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची मान्यता आहे. कोणत्याही राष्ट्रीय संघटनेमध्ये राजकीय हस्तक्षेप नसावा हे धोरण असल्यामुळे भारतीय कुस्ती संघटना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने निलंबन उठवायला हवे, याची वाट बघितली नाही व राष्ट्रीय निवड चाचणीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून या विषयावर मौन बाळगण्यात आले आहे.

India Wrestler Protest
Badlapur Stadium : बदलापुरात आंतरराष्ट्रीय स्टेडियम ; केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पाच कोटींच्या कामाची पायाभरणी होणार

निवड चाचणीनंतर शिबिर

भारतीय कुस्ती संघटनेकडून निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर निवडलेल्या खेळाडूंसाठी राष्ट्रीय शिबिरही पार पडणार आहे. आशियाई कुस्ती स्पर्धा व ऑलिंपिक पात्रता फेरी या दोन महत्त्वाच्या स्पर्धांसाठी भारतीय कुस्ती संघाची निवड करण्यात येणार आहे. जयपूर व पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमधील सर्वोत्तम चार खेळाडू निवड चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहेत. चार खेळाडूंव्यतिरिक्त सर्वोत्तम कामगिरी करीत असलेल्या खेळाडूंनाही यामध्ये संधी असणार आहे. नॉएडा येथे २८ ते ३० मार्चदरम्यान १५ ते २० वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून यामधील अंतिम फेरीतील खेळाडूंना राष्ट्रीय शिबित संधी दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.