French Open 2023 Ball Girl Injured Players Disqualification : फ्रेंच ओपन 2023 ग्रँडस्लॅम स्पर्धेत एक अजब प्रकार घडला. सामन्यादरम्यानच जपान - इंडोनेशियाच्या महिला दुहेरी जोडीला अपात्र ठरवण्यात आले. मियू काटोचा एक फटका बॉल गर्लच्या डोक्याला लागला. यानंतर बॉल गर्ल मुलगी जवळपास 15 मिनिटं रडत होती. अखेर पंचांनी जपान - इंडोनेशियाच्या जोडीला महिला दुहेरी स्पर्धेतून अपात्र ठरवलं.
विशेष म्हणजे जपानी खेळाडूचा एक फटका बेसावध असलेल्या बॉल गर्लला लागला. बॉल लागल्यानंतर ती बॉलगर्ल वेदनेने रडू लागली. जपानी आणि इंडोनेशियाच्या खेळाडूंनी बॉल गर्लची माफी मागितली. या प्रकरणी पंचांनी काटोला वॉर्निंग दिली. मात्र सामन्यात पिछाडीवर असलेल्या चेक रिपब्लिकच्या बूजकोवा आणि स्पेनच्या सोरिबेस टोर्मो यांना पंचांनी कोर्ट 14 मध्ये बोलवलं आणि बॉल गर्लला झालेल्या दुखापतीबाबत माहिती दिली.
यानंतर पंच आणि काटो, तिची जोडीदार यांच्यात दीर्घ चर्चा झाली. यानंतर पंचांनी कोटो आणि तिच्या जोडीदाराला अपात्र ठरवले. यानंतर संपूर्ण मैदान अवाक झाले. दुसरीकडे विरोधी जोडी बूजकोवाने सांगितले की, ही सर्वांसाठीच एक वाईट स्थिती होती. मात्र हा निर्णय नियमांनुसार झाला. हे खूप दुर्दैवी आहे. हा पंचांचा निर्णय होता. बूतकोवाने सांगितले की, मी चेंडू बॉल गर्लला लागल्याचे पाहिले नाही मात्र ती 15 मिनिटे रडत होती.
ज्यावेळी बॉल गर्ल रडत होती. त्यावेळी विरोधी खेळाडू बूजकोवो आणि सोरिबेस या दोघीही हसत होत्या. सोशल मीडियावर यामुळे खूप ट्रॉलिंग सुरू झाले. जपानची काटो आणि इंडोनेशियाची जोडीदार एल्डिला सुत्जियादी महिला दुहेरीच्या तिसऱ्या राऊंडमध्ये बुजकोवा आणि सारा सोरिबेस टॉर्मो सोबतच्या सामन्यात 7 - 6(1), (1-3) अशी आघाडीवर होती.
ग्रँड स्लॅमच्या रूल बूकनुसार, टेनिस कोर्टवर सामना सुरू असताना खेळाडूने गुण घेतानाचा अपवाद वगळता इतर वेळी हिंसक, किंवा धोकादायक पद्धतीने टेनिस बॉलला किक मारणे, बॉल रागात फेकणे किंवा, रॅकेटने बॉल मारणे अशी कृती करू नये असा नियम आहे. यात वॉर्म अप गेमचा देखील समावेश आहे.
जर या नियमाचे उल्लंघन झालं तर मैदानावरील पंच ग्रँड स्लॅमच्या प्रमुख निरीक्षकांशी चर्चा करून निर्णय घेऊ शकतात आणि हा निर्णय अंतिम असेल त्याविरूद्ध दाद मागता येणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.