Balraj Panwar Rowing : रोईंगपटू बलराजनं इतिहास रचला; विक्रमी वेळ नोंदवत पॅरिस ऑलिम्पिकसाठी ठरला पात्र

Balraj Panwar
Balraj Panwar Rowing esakal
Updated on

Balraj Panwar Rowing : भारताचा रोईंगपटू बलराज पनवारनं इतिहास रचत पॅरिस ऑलिम्पिकसाठीचा कोटा मिळवला. त्याने दक्षिण कोरियात सुरू असलेल्या एशियन ऑलिम्पिक पात्रता फेरीत पुरूष एकेरी स्कल प्रकारात तिसरे स्थान पटकावले. त्यानं 2000 मीटरची शर्यत विक्रमी 7:01:27 अशी वेळ नोंदत पूर्ण केली.

स्कल मिश्र दुहेरीत पॅरा रोईंगपटू नारायण कोनगोनापाल्ले आणि अनिता यांनी देखील तिसरे स्थान मिळवत पॅरिस पॅरा ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. या दोघांनी 7:50:80 अशी वेळ नोंदवली. मात्र सांघिक प्रकारात अरविंद सिंह आणि उज्वल कुमार यांना चांगल्या कामगिरीनंतरही ऑलिम्पिकसाठी पात्र होता आलं नाही. या प्रकारात पहिल्या दोन जोड्यांनाच पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट मिळालं.

Balraj Panwar
IPL 2024 KKR Vs RCB : बेंगळुरूच्या पदरी निराशाच! कोलकाताने अवघ्या एका धावेनं दिला पराभवाचा धक्का

बलराज पदक जिंकणार?

बलराज पनवारने 2000m मध्ये पुरुष एकेरी स्कल्समध्ये दमदार कामगिरी केली होती, परंतु वास्तवात, तो पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी दावेदारीपासून तो दूर आहे. 2020 ऑलिंपिकमध्ये, त्याच श्रेणीतील सहाव्या स्थानावरील ऍथलीट, लिथुआनियाच्या मिंडौगास ग्रिस्कोनिसने 6:57:60 सेकंदांची वेळ नोंदवली.

क्रोएशियाच्या दामिर मार्टिनने 6:42.58 सेकंदात कांस्यपदक निश्चित केले. 6:40.45 सेकंद वेळ नोंदवणाऱ्या रोईंपटूला सुवर्णपदक मिळाले. त्यामुळे, ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या स्पर्धेत राहण्यासाठी बलराजला खरोखरच खूप जोर लावावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.