Hima Das : भारतीय धावपटू हिमा दासवर तात्पुरती बंदी

ठावठिकाणा नियमाचे वर्षभरात तीनदा उल्लंघन, `नाडा`ची कारवाई
ban on Indian sprinter Hima Das Violation of rule thrice in a year Nada action
ban on Indian sprinter Hima Das Violation of rule thrice in a year Nada actionSakal
Updated on

नवी दिल्ली : पाच वर्षापूर्वी जागतिक ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत चारशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून प्रकाशझोतात आलेल्या हिमा दासवर राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) तात्पुरती बंदी टाकली आहे. ती गेल्या १२ महिन्यात तीन वेळा आपला ठावठिकाणा सांगण्यास अपयशी ठरली. या मुद्यावरून तिच्यावर बंदी टाकण्यात आली.

या वर्षाच्या सुरुवातीला तिला दुखापत झाली होती. त्यामुळेच तिला पुढील महिन्यात चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. ती गेल्या १२ महिन्यात तीन वेळा ‘नाडा‘ला आपला ठावठिकाणा सांगण्यास अपयशी ठरली. त्यामुळेच तिच्यावर बंदी टाकण्यात आली.

ही माहिती खरी आहे, असे भारतीय ॲथलेटिक्स संघातील एका अधिकाऱ्याने सांगितले. दुखापत आणि खालावली कामगिरी यामुळे तिने यापूर्वीच राष्ट्रीय शिबिरातून माघार घेतली आहे. आता तिच्यावर जास्तीत जास्त दोन वर्षाची बंदी लावल्या जाऊ शकते. तिने आपला ठावठिकाणा का लपविला व कोणत्या परिस्थिती लपविला, ही बाब किती गंभीर आहे.

यावरून तिची शिक्षा कमीत-कमी एक वर्षाची होऊ शकते. हिमाने जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत चारशे मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. त्याचप्रमाणे सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिलांच्या ४-४०० आणि रौप्यपदक जिंकणाऱ्या मिश्र रिले संघात तिचा समावेश होता. दरम्यान, हिमाने आपला ठावठिकाणा कळविला नाही की उत्तेजक चाचणीला अनुपस्थितीत राहीली, याबाबत निश्चित माहिती नाही.

गेल्या काही वर्षापासून हिमा दासला पाठीचा त्रास आहे. यंदा एप्रिल महिन्यात बंगळूर येथील ग्रांप्रीपूर्वी तिचा मांडीचा स्नायूही दुखावला होता. त्यावर तिचा उपाय सुरू होता. या दुखापतीमुळेच तिने मे महिन्यात रांची येथे झालेल्या फेडरेशन करंडक स्पर्धेत भाग घेतला नव्हता.

चाचणीलाही अनुपस्थित?

जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेच्या नियमाप्रमाणे १२ महिन्याच्या कालावधीत एकतर ठावठिकाणाबाबत माहिती न देणे किंवा ठावठिकाणा कळविल्यावर त्यावेळी चाचणीला अनुपस्थित राहणे, असे एकत्रितपणे तीन वेळा झाल्यास त्या खेळाडूवर बंदी टाकण्यात येते.

कारण रजिस्टर टेस्टिंग पूल (आरटीपी) मध्ये नोंदणी झालेल्या खेळाडूला ते कुठे सराव करतात, काम करतात, नियमीत दिनचर्या काय, बाहेरगावी गेल्यास कुठे राहणार अशी विस्तृत माहिती नियमितपणे द्यावी लागते. प्रत्येक तीन महिन्यातील प्रत्येक दिवसातील ६० मिनिटे व स्थळ चाचणीसाठी राखून ठेवावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.