Asia Cup 2023 : 'स्पर्धेदरम्यानच्या प्रवासामुळे...' बांगलादेश बोर्ड आशिया चषकाच्या वेळापत्रकावर नाराज

Bangladesh Cricket Board
Bangladesh Cricket Board
Updated on

BCB Unhappy With Asia Cup Schedule : आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर स्पर्धेतील 4 सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळळले जाणार असल्याचे स्पष्ट झाले. प्रथमच हायब्रीड मॉडेलमध्ये होणाऱ्या आशिया कपच्या कार्यक्रमाबाबतही नाराजी व्यक्त केली जात आहे. यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार बट यांनी सर्वप्रथम आपला संताप व्यक्त केला. त्याचवेळी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ही अधिकृत वेळापत्रकाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Bangladesh Cricket Board
Wi vs Ind 2nd Test: एक चूक अन् खेळ खल्लास! चांगल्या चेंडूवर कर्णधार झाला क्लीन बोल्ड, शतक हुकल्याची खंत

या स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व 6 संघांपैकी भारत वगळता सर्व संघ त्यांचे सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळणार आहेत. त्याचबरोबर भारतीय संघ आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. हे वेळापत्रक विचित्र असल्याचे सांगत पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने पीसीबीवर निशाणा साधला. बांगलादेश क्रिकेट बोर्डचे चेअरमन जलाल युनूस यांनी सांगितले की, स्पर्धेदरम्यानच्या प्रवासामुळे खेळाडूंच्या तयारीवर परिणाम होईल.

Bangladesh Cricket Board
Cricket League: भारतात क्रिकेटच्या खेळपट्टीवरही जात-धर्म! सुरू झाली नवी कास्ट क्रिकेट लीग, गंभीरने केले उद्घाटन

बांगलादेश क्रिकेट बोर्डचे चेअरमन जलाल युनूस यांनी क्रिकबझला दिलेल्या निवेदनात सांगितले की, आम्हाला आमचे सामने श्रीलंकेत आणि पाकिस्तानमध्ये खेळायचे आहेत. आम्ही याबद्दल काहीही करू शकत नाही, आम्हाला जावे लागेल. आम्ही चार्टर्ड विमानाने प्रवास करू, ही जबाबदारी आशियाई क्रिकेट परिषदेची आहे. अर्थात आम्हाला एका चांगल्या विमान कंपनीने प्रवास करायला आवडेल. जर ते राष्ट्रीय विमान कंपनी किंवा चार्टर्ड विमान असेल तर नक्कीच ते सर्वांसाठी चांगले असेल.

Bangladesh Cricket Board
Wi vs Ind: टीम इंडियाचा डाव स्वत:वर उलटला! तिसऱ्या क्रमांकावर गिल फेल, आता कोण आहे दावेदार?

आपल्या निवेदनात जलाल पुढे म्हणाले की, विमानाने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला उड्डाणाच्या 2 तास आधी विमानतळावर पोहोचावे लागते. खेळाडूंना यासाठी मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्ट्या तयार करावे लागेल. जर इतर सर्व संघांनी वेळापत्रक मान्य केले तर आम्हाला त्यानुसार पुढे जावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.