IND vs BAN : तब्बल 11 वर्षानंतर बांगलादेशने केली मोठी कामगिरी; भारताला जाता जाता दिला पराभवाचा धक्का

IND vs BAN : तब्बल 11 वर्षानंतर बांगलादेशने केली मोठी कामगिरी; भारताला जाता जाता दिला पराभवाचा धक्का
Updated on

India Vs Bangladesh : आशिया कप 2023 च्या सुपर 4 मधील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने भारताचा 6 धावांनी पारभव केला. बांगलादेशने तब्बल 11 वर्षानंतर आशिया कपमध्ये भारताचा पराभव केला.

विशेष म्हणजे भारताने बांगलादेशविरूद्ध खेळलेल्या शेवटच्या 4 वनडे सामन्यात फक्त एकदाच विजय मिळवला आहे. बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 266 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताचा संघ 259 धावात ऑल आऊट झाला.

भारताकडून शुभमन गिलने झुंजार 121 धावांची शतकी खेळी केली. तर अक्षर पटेलने 42 धावांची खेळी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला.

IND vs BAN : तब्बल 11 वर्षानंतर बांगलादेशने केली मोठी कामगिरी; भारताला जाता जाता दिला पराभवाचा धक्का
Gautam Gambhir : अत्यंत सुमार दर्जाचं नेतृत्व... गंभीर पुन्हा गरजला, कोणावर साधला निशाणा?

बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 266 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताची सुरूवात खराब झाली. बांगलादेशचा पदार्पण करणाऱ्या तंझीमन चांगला मारा करत रोहित शर्मा आणि तिलक वर्माची शिकार केली. त्यानंतर आलेला केएल आणि इशान किशनही फार काही करू शकले नाहीत. भारताची अवस्था 4 बाद 94 धावा अशी झाली होती.

एका बाजूला भारताची पडझड होत असताना शुभमन गिलने एक बाजू लावून धरली होती. त्याने सूर्यकुमार सोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न करत डाव सावरला खरा. मात्र सूर्यानेही 26 धावा करून त्याची साथ सोडली. दरम्यान, शुभमन गिल आपल्या शतकाच्या जवळ पोहचला होता. मात्र रविंद्र जडेजानेही (7) त्याची साथ सोडली.

IND vs BAN : तब्बल 11 वर्षानंतर बांगलादेशने केली मोठी कामगिरी; भारताला जाता जाता दिला पराभवाचा धक्का
IND vs BAN : बांगलादेशची शेपूट वळवळली; भारतासमोर ठेवलं तगडं आव्हान

यानंतर अक्षर पटेलने शुभमन गिलसोबत महत्वाची भागीदारी रचली. शुभमनने ही आपले शतक पूर्ण करत 2023 मध्ये वनडे मधील आपल्या 1000 धावा देखील पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने आपले वनडेतील 5 वे शतक ठोकले.

मात्र भारताला 200 धावांचा टप्पा पार करून दिल्यानंतर तो बाद झाला. त्यामुळे भारताला विजयाकडे नेण्याची जबाबदारी अक्षर पटेलवर आली. त्यानेही आक्रमक फटकेबाजी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. त्याने 42 धावांची खेळी केली. मात्र विजयासाठी 9 चेंडूत 12 धावांची गरज असताना तो बाद झाला.

IND vs BAN : तब्बल 11 वर्षानंतर बांगलादेशने केली मोठी कामगिरी; भारताला जाता जाता दिला पराभवाचा धक्का
Mohammed Shami : तो आला अन् त्यानं जिंकलं.... संधीची वाट पाहत बेंचवर बसला; आता शमीचा तो Video होतोय व्हायरल

अखेर सामना 6 चेंडूत 12 धावा असा आला होता. भारताची शेवटची जोडी मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा क्रिजवर होते. मात्र पहिल्या तीन चेंडूवर शमीला एकही धाव करता आली नाही.

मात्र चौथ्या चेंडूवर शमीने चौकार मारला. आता भारताला विजयासाठी 2 चेंडूत 8 धावांची गरज होती. मात्र शमी दोन धावा घेण्याच्या नादात धावबाद झाला. बांगलादेशने सामना जिंकून भारताला आशिया कपमधील पहिला पराभव दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.