NZ vs BAN : बांगलादेशनं वनडे सामना 15 षटकात जिंकला! न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये लोळवत इतिहास रचला

बांगलादेशनं न्यूझीलंडची मायदेशात सलग 17 वनडे सामने जिंकण्याची मालिका केली खंडीत
NZ vs BAN
NZ vs BAN esakal
Updated on

Bangladesh Defeat New Zealand : बांगलादेश क्रिकेट संघाने आज क्रिकेट जगतातील एक मोठा उलटफेर केला. बांगलादेशने न्यूझीलंडचा न्यूझीलंडमध्ये पराभव करण्याची किमया केली. बांगलादेशने वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच न्यूझीलंडला धूळ चारली.

विशेष म्हणजे न्यूझीलंडने हा सामना 15 व्या षटकातच जिंकला. न्यूझीलंडची मायदेशातील 17 वनडे सामन्यांची विजयी मालिका बांगलादेशने खंडित केली. जरी हा सामना न्यूझीलंडने गमावला असला तरी मालिका मात्र 2 - 1 अशी खिशात टाकली.

NZ vs BAN
Sanju Samson : ते तीन - चार महिने... वर्ल्डकप खेळण्याची संधी गमावणारा संजू सॅमसन काय म्हणाला?

तिसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 31.4 षटकात फक्त 98 धावा केल्या. त्यानंतर बागंलादेशने न्यूझीलंडचे हे 98 धावांचे माफक आव्हान 15 व्या षटकातच पार केलं.

कर्णधार नजमूल हुसैन शांटोने 42 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या तर अनामुल हकने 33 चंडूत 37 धावांची खेळी केली. बांगलादेशने यापूर्वी न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंडविरूद्ध 19 वनडे सामने खेळले. त्यातील हा पहिला विजय आहे.

बांगलादेशच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर तंजिम हसन साकिबने 14 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर शोरफुल इस्लामने 22 धावात 3 विकेट्स घेतल्या. या दोघांची ही कारकिर्दीतील सर्वोत्तम बॉलिंग फिगर आहे. या दोघांना सौम्या सरकराने 18 धावात 3 विकेट्स घेत उत्तम साथ दिली.

NZ vs BAN
Ishan Kishan : क्रिकेटमधून ब्रेक... किशनने कसोटी मालिकेतून माघार घेण्याचं वैयक्तिक नाही तर मानसिक कारण?

यापूर्वी बांगलादेशने न्यूझीलंडला 162 धावात गारद केलं होतं. आता 98 धावात गारद करत आपलं रेकॉर्ड सुधारलं. नाणेफेक बांगलादेशने जिंकली होती. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॅकलीन पार्क स्टेडियम हे सहसा फलंदाजीला पोषक मानलं जातं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.