Bangladesh England Test Cricket : बांगलादेशची इंग्लंडवर ५० धावांनी मात

शाकिब अल हसनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या इंग्लंडवर ५० धावांनी मात केली.
Bangaladesh and england test cricket competition
Bangaladesh and england test cricket competitionsakal
Updated on
Summary

शाकिब अल हसनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या इंग्लंडवर ५० धावांनी मात केली.

चट्टोग्राम (बांगलादेश) - शाकिब अल हसनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या इंग्लंडवर ५० धावांनी मात केली. या पराभवानंतरही इंग्लंडने मालिका २-१ अशी जिंकली. विजयासाठी आवश्यक असलेल्या २४७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १९६ धावांवर गडगडला.

सॅम करनने बांगलादेशची सलामी जोडी लिटन दास व तमिम इक्बाल यांनी केवळ १७ धावांच्या मोबदल्यात परत पाठविल्यावर नजमूल शांतो आणि मुशफीकूर रहीम यांनी ९८ धावांची भागीदारी करीत बांगलादेशला अडचणीतून बाहेर काढले.

रेहान अहमद सर्वात कमी वयाचा खेळाडू

रेहान अहमदने या सामन्यात इंग्लंडकडून पदार्पण केले. एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणारा तो इंग्लंडचा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला. त्याने १८ वर्षे २०५ दिवसांचा असून यापूर्वी बेन होलिओकेने इंग्लंडचा सर्वात कमी वयाचा खेळाडू होता. त्यावेळी तो २० वर्षे २१ दिवसांचा होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा हसन रझा पदार्पण करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे. त्याने ज्यावेळी पदार्पण केले त्यावेळी तो १४ वर्षे २३३ दिवसांचा होता.

Bangaladesh and england test cricket competition
Liang Jingkun : वर्ल्ड टेबल टेनिस कंटेंडर स्पर्धेत लिआंगला विजेतेपद

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश ४८.५ षटकांत २४६ (नजमूल शांतो ५३, ५ चौकार, मुशफीकूर रहीम ७०, ६ चौकर, शाकिब अल हसन ७५, जोफ्रा आर्चर ३-३५, आदिल रशीद २-२१, सॅम करन २-५१, रेहान अहमद १-६२) वि. वि. इंग्लंड ४३.१ षटकांत सर्वबाद १९६ (जेसन रॉय, फिल साल्ट ३५, ७ चौकार, जेम्स विन्से ३८, सॅम करन २३, जोस बटलर २६, ख्रिस वोक्स ३४, शाकिब अल हसन ४-३५, इबादत हुसेन २-३८, ताईजूल इस्लाम २-५२)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()