BAN vs PAK | VIDEO : बदला! लिटन दासने पंचाच्या मांडीवर मारला चेंडू?

BAN vs PAK T20 World Cup 2022 Litton Das Throw Hit The Umpire Joe Wilson
BAN vs PAK T20 World Cup 2022 Litton Das Throw Hit The Umpire Joe Wilson esakal
Updated on

BAN vs PAK Litton Das Throw : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये साखळी फेरीतील शेवटच्या सुपर संडेमध्ये प्रत्येक सामन्यात वेगळाच थरार पहावयास मिळाला. पहिल्या सामन्यात नेदरलँडने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला घरचे तिकीट काढून दिले. तर पाकिस्तान बांगलादेश सामना पंचांच्या वदग्रस्त निर्णयाने चांगलाच गाजला. पाकिस्तानने बांगलादेशचा 5 विकेट्स राखून पराभव केला खरा मात्र बांगलादेशनेही 127 धावा चेस करणाऱ्या पाकचा निम्मा संघ गारद करत आपली ताकद दाखवून दिली. दरम्यान, लिटन दासने 17 व्या षटकात एक थ्रो मारला. या थ्रोने थेट पंच जो विल्सन यांच्या मांडीचाच वेध घेतला. या थ्रोकडे खराब पंचगिरीचा काही अंशी घेतलेला बदला म्हणून देखील पाहण्यात येत आहे.

BAN vs PAK T20 World Cup 2022 Litton Das Throw Hit The Umpire Joe Wilson
PAK vs BAN Cheaters : नव्या वादाला तोंड फुटंल! पाकिस्तानवर फसवणूक केल्याचा आरोप

पाकिस्तानने बांगलादेशचे 128 धावांचे आव्हान पार करताना 10 षटकात 57 धावांची सावध सलामी दिली. मात्र त्यानंतर बांगलादेशने जोरदार पुनरागमन करत बाबर आझमला 25 तर मोहम्मद रिझवानला 32 धावांवर बाद केले. त्यानंतर पाकिस्तानची धवगती मंदावली. तसेच मोहम्मद नवाझ देखील 11 चेंडूत 4 धावा करून धावबाद झाला. त्यामुळे पाकिस्तानची 15 व्या षटकात 3 बाद 92 अशी अवस्था झाली होती.

मात्र त्यानंतर मोहम्मद हारिस आणि शान मसूद यांनी आक्रमक फलंदाजी करत पाकिस्तानला विजयाच्या जवळ पोहचवले. मात्र विजयासाठी 7 धावांची गरज असताना हारिस 18 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. दरम्यान, इफ्तिकार अहमद आणि शान मसूदने सामना जवळ आणला होता.

BAN vs PAK T20 World Cup 2022 Litton Das Throw Hit The Umpire Joe Wilson
BAN vs PAK : नेदरलँडच्या जीवावर पाकिस्तान बाजीराव! रडत खडत गाठली सेमी फायनल

दरम्यान, मुस्तफिजूरच्या टाकत असलेल्या 18 व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर शान मसूदने यॉर्कवर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कव्हर्समध्ये उभ्या असलेल्या लिटन दासने ही धाव घेण्यापासून मसूदला रोखले. दरम्यान, दासने जोरदार थ्रो केला. मात्र हा थ्रो थेट पंच जो विल्सन यांच्या मांडीवर जाऊन आदळला. सध्या या थ्रोची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

याच षटकात शेवटच्या चेंडूवर मुस्तफिजूरने इफ्तिकारला 1 धावेवर बाद करत पाकिस्तानचा 5 वा फलंदाज माघारी धाडला. अखेर शान मसूदने विजयावर शिक्कामोर्तब केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.