'या' धडाकेबाज फलंदाजाने T20 क्रिकेटमधून घेतली अचानक निवृत्ती

T20 क्रिकेटच्या स्फोटक फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची केली घोषणा
bangladesh skipper tamim iqbal announced retirement from t20i sports cricket
bangladesh skipper tamim iqbal announced retirement from t20i sports cricketsakal
Updated on

Tamim Iqbal T20I retirement : क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. एका स्फोटक फलंदाज त्याच्या चांगल्या टप्प्यातून जात असतानाही T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या खेळाडूचे वय अवघे 33 वर्षे असून या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

bangladesh skipper tamim iqbal announced retirement from t20i sports cricket
VIDEO: लंडनच्या रस्त्यावर फिरणे कॅप्टन कूलला पडले महागात, पुढे जे घडले ते...

बांगलादेशचा प्रमुख फलंदाज तमीम इक्बालने रविवारी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. बांगलादेशने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा चार गडी राखून पराभव केल्यानंतर या अनुभवी फलंदाजाने आपला निर्णय दिला. तमिम इक्बालने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून निवृत्तीची घोषणा केली. त्याने लिहिले की, आजपासून मला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त समजा. तुम्हा सर्वांचे आभार. मी आजपासून T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. तुमचे सर्वांचे आभार.

तमीम इक्बालने 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 24.08 च्या सरासरीने आणि 116.96 च्या स्ट्राइक रेटने 1758 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा तमिम हा एकमेव बांगलादेशी फलंदाज आहे. 2016 टी-20 विश्वचषकात ओमानविरुद्ध भारतीय भूमीवर हे शतक झळकावले होते. तमिम इक्बाल हा बांगलादेशचा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

bangladesh skipper tamim iqbal announced retirement from t20i sports cricket
VIDEO: लंडनच्या रस्त्यावर फिरणे कॅप्टन कूलला पडले महागात, पुढे जे घडले ते...

तमिम इक्बालने सप्टेंबर 2007 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. येथून त्याने केवळ टी-20 आंतरराष्ट्रीयच नव्हे तर सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये बांगलादेशच्या प्रमुख फलंदाजाची भूमिका बजावली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण करण्यापासून तो केवळ 57 धावा दूर आहे आणि असे करणारा तो पहिला बांगलादेशी फलंदाज बनणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.