Mushfiqur Rahim Retirement : बांगलादेश आशिया कपमधून बाहेर पडताच 'या' स्टार खेळाडू घेतली निवृत्ती

बांगलादेशचा स्टार यष्टीरक्षकने आशिया चषक 2022 हंगामातील अत्यंत खराब कामगिरीनंतर निवृत्तीची घोषणा केली आहे.
Mushfiqur Rahim
Mushfiqur Rahimsakal
Updated on

Mushfiqur Rahim Retirement : बांगलादेशचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने आशिया चषक 2022 हंगामातील अत्यंत खराब कामगिरीनंतर निवृत्तीची घोषणा केली आहे. 35 वर्षीय मुशफिकुरने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मुशफिकुर रहीमने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. यासोबतच त्याने निवृत्तीचे कारणही उघड केले आहे.

Mushfiqur Rahim
शिक्कामोर्तब! lPL 2023 पूर्वी आनंदाची बातमी; MS Dhoni असणार CSK चा कर्णधार

मुशफिकर रहीमने ट्विटमध्ये काय लिहिले?

या स्टार यष्टीरक्षकाने ट्विटमध्ये लिहिले की, मी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. आता मला माझे पूर्ण लक्ष फक्त कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवर केंद्रित करायचे आहे. मी फ्रँचायझी लीग खेळण्यासाठी उपलब्ध असेल, मला जेव्हा आणि जिथे संधी मिळेल तेव्हा मी खेळेन. आता मी पुढील दोन फॉरमॅटमध्ये माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करत राहीन.

आशिया कपमध्ये बांगलादेशने एकही सामना जिंकता नाही

आशिया चषक स्पर्धेत यावेळी बांगलादेशची कामगिरी खूपच खराब राहिली. बांगलादेश संघाला गटातील एकही सामना जिंकता आला नाही आणि तो बाहेर पडला. अफगाणिस्तान आणि श्रीलंकेने बांगलादेशचा पराभव केला. बांगलादेशने गेल्या दोन आशिया चषक मोसमात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Mushfiqur Rahim
Virat Kohli : Ind vs Pak हायव्होल्टेज सामन्याआधी 'हाई ऑल्टिट्यूड मास्क' घालून कोहली मैदानात

मुशफिकुरने नोव्हेंबर 2006 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. यानंतर त्याने आतापर्यंत 102 सामने खेळले. यादरम्यान मुशफिकुरने 1500 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याने 6 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने 126 चौकार आणि 37 षटकार मारले आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याचा स्ट्राइक रेट 114.94 आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.