BAN vs IND 1st Test Day 3 : शुभमन पाठोपाठ चेतेश्वरनेही ठोकले शतक; बांगलादेशसमोर 513 धावांचे मोठे आव्हान

Bangladesh vs India 1st Test Day 3
Bangladesh vs India 1st Test Day 3 esakal
Updated on

Bangladesh vs India 1st Test Day 3 : भारताने चेतेश्वर पुजाराच्या शतकानंतर आपला दुसरा डाव 2 बाद 258 धावांवर घोषित केला. आता बांगलादेशसमोर विजयासाठी 513 धावांचे मोठे आव्हान आहे. भारताकडून शुभमन गिलने 110 धावांची तर चेतेश्वर पुजाराने नाबाद 102 धावांची शतकी खेळी केली. तर विराट कोहली 19 धावा करून नाबाद राहिला. यानंतर बांगलादेशने तिसऱ्या दिवसअखेर 12 षटकात नाबाद 42 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी शंतो 25 तर झाकीर हसन 17 धावा करून नाबाद होते.

बांगलादेशच्या नाबाद 42 धावा 

पुजाराचे वेगवान शतक; भारताने  दुसरा डाव केला घोषित 

चेतेश्वर पुजाराने 130 चेंडूत नाबाद 102 धावा करत आपले सर्वात वेगवान शतक ठोकले. याचबरोबर भारताने आपला दुसरा डाव 2 बाद 258 धावांवर घोषित केला. आता बागंलादेशसमोर विजयासाठी 513 धावांचे आव्हान आहे.

चेतेश्वर पुजाराचे सलग दुसरे अर्धशतक

चेतेश्वर पुजाराने बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात देखील अर्धशतक ठोकले.

शुभमन गिलने ठोकले पहिले शतक

चहापानापर्यंत भारताकशुडे 394 धावांची आघाडी 

शुभमन गिलच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने चहापानापर्यंत भारताने आपली आघाडी 394 धावांपर्यंत पोहचवली. चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिलने नाबाद 70 धावांची भागीदारी रचली होती. गिल सध्या 80 धावांवर तर पुजारा 33 धावा करून नाबाद आहेत.

शुभमन गिलचे अर्धशतक

भारताचा सलामीवीर शुभमन गिलने सुरूवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत भारताची आघाडी वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने 84 चेंडूत नाबाद अर्धशतक ठोकत संघाला 83 धावांपर्यंत पोहचवले. यामुळे भारताची आघाडी 337 धावांपर्यंत पोहचली आहे. गिलचे हे कसोटीतील पाचवे अर्धशतक आहे.

70-1 : भारताला पहिला धक्का, केएल राहुल सेट होऊन झाला बाद  

खालीद अहमदने भारताला पहिला धक्का दिला. त्याने 70 धावांची सलामी देणारी राहुल - गिलची जोडी फोडली. खालीदच्या अखूड चेंडूवर केएल राहुल 63 चेंडूत 23 धावा करून बाद झाला.

केएल राहुल - शुभमन गिलची अर्धशतकी सलामी 

भारताने दुसऱ्या डावात केएल राहुल आणि शुभमन गिलने नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. याच्या जोरावर भारताने आपली आघाडी 300 च्या पार पोहचवली.

लंच : भारताकडे भक्कम आघाडी 

भारताने आपल्या दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवशीच्या लंचपर्यंत 15 षटकात बिनबाद 36 धावा केल्या आहेत. सध्या भारताकडे 290 धावाची आघाडी घेतली.

भारताकडे पहिल्या डावात 254 धावांची भक्कम आघाडी 

150-10 : बांगलादेश 150 पार 

मेहदी हसनने बांगलादेशला 150 च्या पार पोहचवले. अखेर त्याला अक्षर पटेलने 25 धावांवर बाद केले.

144 - 9 : कुलदीप यादवचा पंजा

बांगलादेशने तिसऱ्या दिवशी आपला पहिला डाव 8 बाद 133 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केला. मात्र कुलदीप यादवने इबादतला 17 धावांवर बाद करत बांगलादेशला 9 वा धक्का दिला. याचबरोबर आपल्या 5 विकेट्स देखील पूर्ण केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.