BAN vs IND 3rd ODI : भारताची Playing 11! शेवटच्या सामन्यात 'या' धडाकेबाज डावखुऱ्या फलंदाजाला संधी?

Bangladesh Vs India 3rd ODI India Playing 11
Bangladesh Vs India 3rd ODI India Playing 11 esakal
Updated on

Bangladesh Vs India 3rd ODI India Playing 11 : भारताने बांगालदेशविरूद्धचा दुसरा सामना अवघ्या 5 धावांनी गमावला. या सामन्याबरोबरच भारताच्या हातून मालिका देखील निसटली. बांगलादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत 2 - 0 अशी विजयी आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाबरोबरच दुखापतींचा देखील मोठा फटका बसला. कुलदीप सेन दुखापतीमुळे खेळू शकला नाही. सामना सुरू झाल्या झाल्या कर्णधार रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली. गोलंदाजी करताना दीपक चाहरच्या मांडीला दुखापत झाली. अशा परिस्थिती तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारताची प्लेईंग 11 कशी निवडायची या यक्ष प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे.

Bangladesh Vs India 3rd ODI India Playing 11
IND vs BAN : टीम इंडियात नेतृत्व बदलाचे वारे! बांगलादेश दौऱ्यात होणार मोठा बदल

भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर गेल्यापासून दुखापती पाठ सोडत नाहीयेत. ऋषभ पंत दौरा अर्ध्यात सोडून गेला. त्यामुळे भारताला केएल राहुलला मारून मुटकून विकेटकिपर करण्यात आले. याचबरोबर मोहम्मद शमीचा खांदा दुखावला, कुलदीप सेनला देखील ऐका सामन्यानंतर दुखापत झाली. यामुळे पुन्हा दुसऱ्या सामन्यात भारताला संघात बदल करावा लागला. आता तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि दीपक चाहर जायबंदी झाले. त्यामुळे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात व्यवस्थापनाला कर्णधारासह अनेक बदल करण्याशिवाय गत्यंतर नाही.

Bangladesh Vs India 3rd ODI India Playing 11
Virender Sehwag : यांना हलवून जागं करायला हवं... विरेंद्र सेहवागच्या टीम इंडियाला कानपिचक्या

तिसऱ्या सामन्यासाठी कर्णधारपदासाठी दोन नावे प्रामुख्याने समोर येतात. केएल राहुल आणि शिखर धवन या रेसमध्ये आहेत. मात्र मालिकेपूर्वीच केएल राहुल संघाचा उपकर्णधार घोषित केला गेला होता. त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत तिसऱ्या वनडेत भारताचे नेतृत्व करेल. दुसऱ्या सामन्यात रोहित बाहेर गेल्यानंतर देखील राहुलनेच धुरा खांद्यावर घेतली होती. आता रोहितच्या जागी सलामीला कोण येणार हा देखील मोठा प्रश्न आहे. यासाठी भारतीय संघाकडे दोन पर्याय आहेत. इशान किशन आणि केएल राहुल. जर सलामीला डावखुऱ्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजांचे कॉम्बिनेशन हवे असेल तर इशान किशन मधल्या फळीत खेळेल आणि केएल राहुल सलामीला खेळेल. यातबरोबर राहुलनचा विकेटकिपिंगचा भार देखील इशान किशन उचलण्याची शक्यता आहे.

Bangladesh Vs India 3rd ODI India Playing 11
Kuldeep Sen : लागलं ग्रहण! केवळ एकच सामना खेळून कुलदीप सेन संघातून बाहेर

भारताची तिसऱ्या सामन्यातील संभाव्य प्लेईंग 11

केएल राहुल (कर्णधार)

शिखर धवन

विराट कोहली

इशान किशन (विकेटकिपर)

श्रेयस अय्यर

वॉशिंग्टन सुंदर

शाहबाज अहमद

अक्षर पटेल

शार्दुल ठाकूर

मोहम्मद सिराज

उमरान मलिक

हेही वाचा : Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.