South Africa vs Bangladesh, 3rd ODI : बांगलादेश संघाने सेंच्युरियनच्या मैदानात झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात विजय नोंदवला आहे. या सामन्यात 141 चेंडू आणि 9 विकेट्स राखून विजय नोंदवत बांगलादेशनं (Bangladesh Cricket Team) नवा इतिहास रचलाय. दक्षिण आफ्रिकेचा संघ (South Africa) त्यांच्यासमोर अक्षरश: हतबल ठरला. आफ्रिकेच्या मैदानात पहिल्यांदाच बांगलादेशनं एखादी मालिका जिंकण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे.
बांगलादेशनं (Bangladesh Cricket Team)या सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करताना तस्कीन अहमदने (Taskin Ahmed) घेतलेल्या पाच विकेट्सच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला 37 षटकात 154 धावांत आटोपले होते. धावांचा पाठलाग करताना बांगलादेशनं 1 विकेट गमावून 26.3 षटकातच सामना खिशात घातला. कर्णधार तमीम इकबाल याने नाबाद 87 धावांची खेळी केली. लिंटन दास याने 48 धावांचे योगदान दिले. तमीमनं आपल्या कारकिर्दीतील 52 वे अर्धशतक झळकावले. त्याने 82 चेंडूचा सामना करताना 14 खणखणीत चौकार लगावले. दासने 57 चेंडूत 8 चौकार खेचले. दुसऱ्या बाजूला शाकिब अल हसन याने 20 चेंडूत दोन चौकाराच्या मदतीने नाबाद 18 धावांची खेळी केली.
जानेवारीमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. वनडेत भारतीय संघाला 3-0 अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण बांगलादेशनं दक्षिण आफ्रिकेला 2-1 असे पराभूत करुन दाखवत क्रिकेटमध्ये आम्हाला कमी समजू नका असा आणखी एकदा संदेश दिलाय. पहिल्यांदा गोलंदाजी करताना तस्कीन अहमदने भेदक मारा केला. त्याने 9 षटकात 35 धावा खर्च करून अर्धा संघ तंबूत धाडला. त्याला सामनावीरासह मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
पहिल्यांदा बॅटिंग करताना दक्षिण आफ्रिका संघाने चांगली सुरुवात केली. क्विटंन डिकॉक आणि जानेमन यांनी पहिल्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी रचली. पण ही जोडी फुटल्यानंतर ठराविक अंतराने दक्षिण आफ्रिकेला धक्क्यावर धक्के बसत राहिले. शंभरीच्या आतच अर्धा संघ तंबूत परतला होता. आफ्रिकेकडून जानेमन मलान याने सर्वाधिक 39 धावा केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.