न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्डकप 2022 मध्ये (ICC Women's World Cup 2022) बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाने (Bangladesh Women's Cricket Team) ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी पाकिस्तानचा (Pakistan Women's Cricket Team) 9 धावांनी पराभव करत वर्ल्डकपमधील आपली पहिला वहिला विजय साजरा केला. या पहिल्याच विजयाचा आनंद बांगला खेळाडूंनी डान्स करून साजरा केला. दुसरीकडे पाकिस्तानला यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अजून आपले खाते देखील उघडता आलेले नाही. पाकिस्तान सध्या गुणतालिकेत तळात आहे.
पाकिस्तानचा यंदाच्या वर्ल्डकपमधील हा चौथा सामना होता. बांगलादेशबरोबरचा हा सामना जिंकून पाकिस्तान विजयी खाते उघडले असे वाटले होते. मात्र बांगलादेशन पाकिस्तानला चांगलाच धक्का दिला. (Bangladesh Beat Pakistan) बांगलादेश या विजयाने गुणतालिकेत आता इंग्लंडच्या वर पोहोचली आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने 50 षटकात 7 बाद 234 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानने देखील या 235 धावांच्या आव्हानाला 2 बाद 183 धावा करत चांगले प्रत्युत्तर दिले होते. मात्र त्यानंतर फक्त 5 धावात पाकिस्तानने पाच फलंदाज गमावले. अखेर पाकिस्तानचा डाव 225 धावात गुंडाळली गेली.
बांगलादेशकडून फातिमा खाजूनने 8 षटकात 3 विकेट मिळवत भेदक मारा केला. तर रूहाना अहमदने देखील 2 विकेट घेत बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयाला (Bangladesh Historical Win) हातभार लावला. या विजयानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.