बांगलादेश विकेट किपर फलंदाज मुश्फिकुर रहिम (Mushfiqur Rahim) याने आयसीसीचा मंथ ऑफ प्लेयर (ICC Player of the Month) पुरस्कार पटकवाय. श्रींलकेविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरीचे आयसीसीने त्याला बक्षीस दिले. मे महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा मान त्याला मिळाला. आयसीसीचा मानाचा पुरस्कार पटकवणारा तो बांगलादेशचा पहिला क्रिकेटर ठरलाय.
मे महिन्यातील 'प्लेयर ऑफ द मंथ' च्या शर्यतीत पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हसन अली आणि श्रीलंकेचा प्रवीण जयविक्रमा यांना मानांकन देण्यात आले होते. या दोघांना मागे टाकत रहिमने या पुरस्कारावर आपली छाप सोडली. श्रीलंकेविरुद्ध त्याने कमालीची फलंदाजी केली होती. याचा त्याला फायदा झाला. महिला क्रिकेटमध्ये स्कॉटलंडची अष्टपैलू क्रिकेटर कॅथरिन ब्रायस हिला आयसीसी प्लेयर ऑफ मंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रहिमने 3 वनडेत 79 च्या सरासरीने 237 धावा केल्या होत्या. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. या वर्षाच्या सुरुवातीपासून आयसीसीने महिन्याभरातील कामगिरीच्या जोरावर प्लेयर्सा सन्मानित करण्याचा नवा उपक्रम सुरु केला आहे. या पुरस्काराचा पहिला मानकरी हा रिषभ पंत ठरला होता. एवढेच नाही तर फेब्रुवारी आणि मार्चमध्येही या पुरस्कारावर भारतीयांनी छाप सोडली होती. अनुक्रमे अश्विन आणि भुवीने हा पुरस्कार पटकावला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.