बास्केटबॉल केवळ खेळ नव्हे जीवनशैली आहे : श्रुती भोसले

Shruti Bhosale National Basketball Player
Shruti Bhosale National Basketball Player
Updated on

सातारा ः बास्केटबॉलची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सातारा शहरातील श्रुती गोविंद भोसले हिची दोन वेळा एनबीए अकादमीच्या बास्केटबॉल सराव शिबिरास निवड झाली. श्रुतीचे खेळातील कौशल्य पाहता साताऱ्याच्या बास्केटबॉल क्षेत्राला पुन्हा एकदा सुवर्णकाळ प्राप्त होईल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.
 
निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना श्रुतीला इयत्ता पाचवीपासून बास्केटबॉल खेळाची आवड निर्माण झाली. तिने 14 वर्षांखालील गटात राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर नाशिक येथे झालेल्या 13 वर्षांखालील गटातील राज्य अजिंक्‍यपद स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघात श्रुतीची निवड झाली. पदुचेरी येथे झालेल्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत कास्यपदकाची कमाई केली. त्यानंतर श्रुतीने मागे वळून पाहिले नाही. एकेक राज्य स्पर्धांत तिने आपली कामगिरी उंचावत ठेवली. आत्तापर्यंत तिने 25 राज्य स्पर्धा तसेच 11 राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत. पुणे येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत तिने राज्याचे प्रतिनिधित्व केले.
 
पदुचेरी येथे झालेल्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत 18 वर्षांखालील गटात आणि उदयपूर येथे झालेल्या 16 वर्षांखालील गटात कास्यपदक मिळविले. आजपर्यंत तिने एक सुवर्णपदक तसेच तीन कास्यपदकांची कमाई केली आहे. खेळाबरोबरच तिने शिक्षणाला ही तेवढेच महत्त्व दिले आहे. यामुळेच तिला इयत्ता दहावीत असताना 97 टक्के तसेच बारावीत 94 टक्के गुण मिळाले आहेत. प्रशिक्षक नीतेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ती नित्यनेमाने सराव करीत असते.
 
माझ्यासाठी बास्केटबॉल हा फक्त एक खेळ नाही, ही एक जीवनशैली आहे. एनबीए अकादमीने माझा खेळ सुधारण्यास मदत झाली आहे. आई अलका आणि वडील गोविंद यांचे पाठबळामुळेच खेळ आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात मी समतोल कामगिरी करू शकते, असे श्रुती नेहमी सांगते. ग्रेटर नोएडा दिल्ली येथे झालेल्या एनबीए अकादमीच्या बास्केटबॉल सराव शिबिरासाठी नुकतीच निवड झाली होती. त्यानंतर पुन्हा एनबीए अकादमीने मुंबई येथे होणाऱ्या सराव शिबिरासाठी तिची निवड केली होती. सध्या श्रुती पाटणा (बिहार) येथे होत असलेल्या 70 व्या ज्युनिअर (18 वर्षांखालील) राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करीत आहे. 


एनबीए बास्केटबॉल अकादमी 

एनबीए अकादमी इंडिया, एनबीएच्या अस्तित्त्वात असलेल्या बास्केटबॉल आणि युवा विकास उपक्रमांवर आधारित आहे. रिलायन्स फाऊंडेशन जूनियर एनबीए कार्यक्रमात सुरू झाल्यापासून त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. देशभरात पाच हजारहून अधिक शारीरिक शिक्षण प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारतातील आघाडीच्या क्रीडा व्यवस्थापन, विपणन आणि विकास कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिया ऑन ट्रॅक (आयओटी) सह बहुराष्ट्रीय कराराचा भाग म्हणून मुंबईतील प्रथम एनबीए बास्केटबॉल स्कूल सुरू करण्यात आले आहे. याव्यतरिक्त राज्यातील विविध भागातील खेळाडूंची निवड करुन त्यांची प्रशिक्षणासाठी निवड केली जात आहे. 
संदर्भ - https://nbaacademy.nba.com/location/india/ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.