Live मॅचमधील किसचा किस्सा; व्हिडिओ होतोय व्हायरल

हा प्रकार काहींना बुचकळ्यात पाडणारा तर काहींच्या गालावर हसू फुलवणारा होता.
Big Bash League
Big Bash League Sakal
Updated on

Big Bash League 2021-22: ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय बिग बॅश लीग 2021 (BBL 2021) मधील 16 व्या सामना सिडनी सिक्सर्स आणि एडिलेड स्ट्रायकर्स (Sydney Sixers vs Adelaide Strikers) यांच्यात रंगला होता. या सामन्यादरम्यान एक गंमतीशीर किस्सा घडल्याचे पाहायला मिळाले. मॅच सुरु असताना घडलेला प्रकार काहींना बुचकळ्यात पाडणारा तर काहींच्या गालावर हसू फुलवणारा होता.

सिडनी सिक्सर्सच्या डावाच्या सुरुवातीला हा गंमतीशी प्रकार घडला. सिडनीचे फलंदाज तयार झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने एडिलेडकडून डॅनियल वॉर्ल गोलंदाजीसाठी तयार झाला. गोलंदाजीपूर्वी कॅप्टन त्याला सल्ला देण्यासाठी डॅनियल जवळ आला. पीटर सिडलने आपल्या गोलंदाजासोबत चर्चा केली. डॅनियल जेव्हा बॉल टाकण्यासाठी तयार झाला त्यावेळी कॅप्टनने त्याच्या गालावर किस केले. हा प्रकार पाहून प्रेक्षकांच्यात एकच हशा पिकला. सामन्यादरम्यान घडलेल्या या प्रकाराच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते.

Big Bash League
चुकलंच! शाहरुखला सोडल्यावर प्रिती असाच विचार करत असेल...

या सामन्यात सिडनीने एडिलेड संघाला 4 विकेट्सने पराभूत केले. सीन एबोटने कमालीची गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांच्या कोट्यात 24 धावा खर्च करुन 3 विकेट घेतल्या. त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याच्याशिवाय डॅनियल ख्रिश्चियन याने 3 विकेट घेतल्या.

एडिलेड संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात 147 धावा केल्या होत्या. सिडनी सिक्सर्स संघाने 19.2 षटकात 6 विकेट गमावत हे लक्ष्य पार केले. सि़डनीकडून जार्डन सिल्क याने 36 धावांची खेळी केली. सिडनी सिक्सर्सकडून खेळणाऱ्या सीन एबोट याने या सामन्यात विक्रमी कामगिरी नोंदवली. बीबीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज ठरलाय. एबोट याने बीबीएल कारकिर्दीत आतापर्यंत 112 विकेट घेतल्या आहेत.

Big Bash League
PKL 2021 : 'ले पंगा' कधी कुठे अन् कसे पाहायचे सामने?

सिडनी सिक्सर्सने 5 पैकी 4 सामन्यातील विजयासह 14 गुण मिळवून गुणतालिकेत अव्वलस्थान मिळले आहे. एडलिडचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात त्यांनी केवळ एकच सामना जिंकला आहे. त्यांच्या खात्यात केवळ 6 गुण आहेत. पर्थ स्कॉचर्स, सिडनी थंडर्स, मेलबर्न स्टार्स यांनीही प्रत्येकी 4-4 सामने खेळले असून गुणतालिकेत हे संघ अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

Big Bash League
जपाननं ऑलिम्पिक चॅम्पियन टीम इंडियाला रोखून दाखवलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.