ICC's Revenue PCB vs BCCI Earning Comparison : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2024-27 साठी विविध संघांना मिळणारा रेवेन्यू जाहीर केला आहे. आयसीसीच्या निर्णयावर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसीच्या या महसुलात बीसीसीआयचा हिस्सा 38.5 टक्के आहे. त्याच वेळी पाकिस्तानला फक्त 5.75 टक्के एकूण वाटा मिळाला आहे. पाकिस्तानला मिळालेल्या वाट्याने तो नाराज दिसत होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या कमाईबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
ICC चा रेवेन्यू पूल 600 दशलक्ष यूएस डॉलर (49 अब्ज भारतीय रुपये) आहे. यामध्ये बीसीसीआयला आयसीसीच्या कमाईतील 230 मिलियन डॉलर म्हणजे (1887 कोटी रुपये) मिळतील. दुसरीकडे, पाकिस्तान बोर्ड क्रिकेट सायकलमध्ये 2024-27 मध्ये ICC च्या कमाईतून 34.51 अमेरिकी डॉलर म्हणजे 280 कोटी मिळतील.
आयसीसीच्या या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डने नाराजी व्यक्त केली. पीसीबीने एका निवेदनात म्हटले आहे की, "त्यांच्या घटनात्मक अधिकारानुसार, गेल्या काही आठवड्यांत आयसीसीच्या बैठकीत प्रत्येक पॅरामीटरसाठी वेटेजचे वाटप आणि तर्क अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अतिरिक्त माहिती मागवली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने निवेदनात पुढे म्हटले आहे की,,"आयसीसीने घाईघाईत इतका महत्त्वाचा निर्णय घ्यायला नको होता.
इतर देशांनी पीसीबीचा प्रस्ताव नाकारला
पीसीबीने प्रस्ताव दिला होता की मॉडेलच्या मंजुरीसाठी वोटिंग प्रक्रिया पुढील आयसीसी बैठकीपर्यंत पुढे ढकलण्यात यावी. तथापि इतर सदस्य देशांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सूचनेशी सहमत नाही, ज्यामुळे आयसीसीने रेवेन्यू मॉडेलला अंतिम रूप दिले. त्याचबरोबर पाकिस्तान लवकरच आशिया कपचे अंतिम वेळापत्रक जाहीर करू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.