BCCI Announce Mohammed Shami Will Replace Jasprit Bumrah : अखेर बीसीसीआयने आज ( दि. 14 ) जसप्रीत बुमराहची जागा कोण घेणार याची घोषणा केली. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी जसप्रीत बुमराहची जागा घेणार आहे. नुकतेच शमीने फिटनेस टेस्ट देखील पास केली होती.
बीसीसीआय सचिव जय शहा यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे दुखापतीमुळे वर्ल्डकप संघातून बाहेर गेलेल्या जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची संघात निवड झाल्याची घोषणा केली. आयसीसीकडे रिप्लेसमेंटचे नाव देण्याची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर होती. त्याच्या एक दिवस आधी बीसीसीआयने आपल्या संघातील बदल जाहीर केला.
प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहेत की, 'भारतीय वरिष्ठ संघ निवडसमितीने आयसीसी टी 20 वर्ल्डकपसाठीच्या संघातील जसप्रीत बुमराची रिप्लेसमेंट म्हणून मोहम्म शमीची निवड केली आहे. मोहम्मद शमी आधीच ऑस्ट्रेलियामध्ये पोहचला आहे. तो ब्रिसबेनमध्ये संघाशी जोडला जाईल.
याचबरोबर बीसीसीआय मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना स्टँड बाय खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाला पाठवणार आहे. यापूर्वी स्टँडबायमध्ये दीपक चाहरचे नाव होते. मात्र तो दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या ऐवजी शार्दुल ठाकूरला स्टँड बायमध्ये ठेवण्यात आले आहे. मोहम्मद सिराजने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत प्रभावी मारा करत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे त्याची स्टँड बाय खेळाडू म्हणून वर्णी लागली आहे.
भारताचा वर्ल्डकपसाठीचा सुधारित संघ (India squad for ICC T20 World Cup) :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
स्टँड बाय :
मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.