Ruturaj Gaikwad Asian Games 2023 : बीसीसीआयने चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्स 2023 साठी भारताची महिला आणि पुरूष क्रिकेट संघाची घोषणा आज केली. पुरूष संघाचे नेतृत्व महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे. यापूर्वी भारताचा सलामीवीर शिखर धवन या संघाचे नेतृत्व केरेल अशी चर्चा होती.
मात्र बीसीसीआयने एशियन गेम्ससाठी संपूर्ण युवा संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या संघात तिलक वर्मा, रिंकू सिंह आणि जितेश शर्मा या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंना देखील संधी मिळाली आहे.
भारताचा पुरूष संघ : ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहदम, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग. (Ruturaj Gaikwad Team India Captain)
स्टँड बाय खेळाडू : यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, साई सुदर्शन
चीनमध्ये होणाऱ्या 19 व्या एशियन गेम्स 2023 मध्ये क्रिकेटचा देखील समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. यासाठी बीसीसीआयने आपला महिलांचा अव्वल संघ तर पुरूषांचा युवा संघ पाठवण्याचा निर्णय घेतला.
ही स्पर्धा 28 सप्टेंबरपासून 8 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. त्याचदरम्यान भारतात वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार असल्याने भारताचा मुख्य संघ एशियन गेम्ससाठी पाठवण्यात येणार नाही.
याचाच अर्थ जे एशियन गेम्समध्ये खेळणार आहेत ते खेळाडू भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप संघाचा भाग नसणार आहेत. यापूर्वी शिखर धवनकडे या युवा संघाचे नेतृत्व देण्याची चर्चा होती. मात्र संघ जाहीर होताच त्याचे या संघात नाव नव्हते. यामुळे शिखर धवनच्या भारतात होणाऱ्या वर्ल्डकप खेळण्याचा आशा वाढल्या आहेत.
तर नुकतेच वेस्ट इंडीजविरूद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात 171 धावांची दमदार खेळी करणारा यशस्वी जैसवालचा देखील निवडसमिती वनडे वर्ल्डकपसाठी विचार करत नसल्याचे संकेत मिळाले आहेत. हाच न्याय ऋतुराज गायकवाडला देखील लागू होते.
एशियन गेम्समध्ये खेळणाऱ्या भारतीय पुरूष क्रिकेट संघात अर्शदीप सिंग, आवेश खान आणि रवी बिश्नोई यांचा देखील समावेश आहे. यांचा देखील वर्ल्डकप संघातून पत्ता कट झाल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.