केएल राहुलच्या गळ्यात भारतीय टी 20 संघाच्या कर्णधारपदाची माळ

BCCI announce Squad KL Rahul Will Lead Indian T20 Team
BCCI announce Squad KL Rahul Will Lead Indian T20 Team ESAKAL
Updated on

मुंबई : बीसीसीआयने (BCCI) दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा केली असून या संघाचे नेतृत्व (Captain) केएल राहुलकडे (KL Rahul) देण्यात आले आहे. याचबरोबर उमरान मलिकला देखील टी 20 संघात स्थान मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या संघात आयपीएलच्या 15 व्या हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा भरणा आहे. यात उमरान मलिक, आवेश खान, अर्शदीप सिंग यासारख्या नवख्या खेळाडूंचा समावेश आहे. तर दिनेश कार्तिकने देखील संघात पुनरागमन केले आहे. संघ निवडीपूर्वी संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या होणार अशी चर्चा होती. मात्र निवडसमितीने केएल राहुलवर विश्वास दाखवला आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चांगली कामगिरी केली नव्हती.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. अपेक्षेप्रमाणे भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून नव्या दमाच्या खेळाडूंचा टी 20 संघात भरणा आहे. या संघाचे नेतृत्व केएल राहुल करणार असून यात ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()