India Tour Of West Indies : वेस्ट इंडीज दौऱ्याची तारीख ठरली! सामन्याची वेळ भारतीयांची झोप उडवणारी

India Tour Of West Indies Full Schedule
India Tour Of West Indies Full Schedule esakal
Updated on

India Tour Of West Indies Full Schedule : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपची फायनल संपल्यानंतर भारतीय संघ पुन्हा कधी मैदानावर दिसणार याची उत्सुकता सर्व क्रिकेट चाहत्यांना होती. आज बीसीसीआयने भारताच्या वेस्ट इंडीज दौऱ्याची तारीख आणि संपूर्ण वेळात्रक प्रसिद्ध करत ही उत्सुकता संपवली. भारताचा हा दौरा 12 जुलैपासून सुरू होणार असून तो 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन कसोटी, तीन वनडे तर पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

India Tour Of West Indies Full Schedule
Sunil Gavaskar Rohit Sharma : उद्या अजून काही मागाल... गावसकरांनी कारणे देणाऱ्या रोहितवर काढला जाळ

बीसीसीआयने भारताच्या वेस्ट इंडीज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. भारताचा वेस्ट इंडीज दौरा हा 12 जुलैपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ एकूण आठ सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना हा 12 ते 16 जुलै दरम्यान विंडसोर पार्क स्टेडियमवर होणार असून दुसरा कसोटी सामना हा 20 जुलै ते 24 जुलै दरम्यान क्विन्स पार्क ओव्हलवर होईल. दोन्ही कसोटी सामने हे भारतीय वेळेनुसार रात्री 7.30 पासून सुरू होतील.

India Tour Of West Indies Full Schedule
Wrestler Protest : बृजभूषण यांना 15 जूनपर्यंत अटक नाहीच; दिल्ली पोलीस घेणार 5 देशांची मदत?

त्यानंतर 27, 29 जुलै आणि 1 ऑगस्टला भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन वनडे सामने होतील हे सामने भारतीय वेळेनुसार रात्री 7 वाजता सुरू होतील. पहिले दोन वनडे सामने बार्बाडोस आणि तिसरा त्रिनिदाद येथे होईल. तर पाच टी 20 सामन्यांची मालिका ही 3 ऑगस्ट पासून सुरू होईल. या सामन्यांची वेळ रात्री 8 वाजता असेल. हे पाच सामने 3, 6, 8, 12, 13 ऑगस्टला खेळवले जातील. यातील पहिला सामना त्रिनिदाद दोन सामने गयाना आणि शेवटचे दोन सामने हे फ्लोरिडा येथे खेळवले जातील.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.