भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी देशांतर्गत क्रिकेट हंगामासंदर्भात मोठी घोषणा केलीये. 21 सप्टेंबरपासून सीनियर महिला वनडे लीग स्पर्धेच्या माध्यमातून देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात होईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर 2021 सीनियर महिला वनडे चॅलेंज ट्रॉफी नियोजित आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेला 20 ऑक्टोबर, 2021 पासून सुरुवात होणार असून या स्पर्धेचा फायनल सामना 12 नोव्हेंबर, 2021 रोजी खेळवण्यात येणार आहे. (BCCI Announces India Domestic Season For 2021 To 22 Latest Cricket News In Marathi)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित रणजी ट्रॉफीचा हंगाम रद्द करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली होती. 2021-22 च्या हंगामात 16 नोव्हेंबर, 2021 ते 19 फेब्रुवारी, 2022 पर्यंत तीन महिन्यांच्या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाईल. विजय हजारे ट्रॉफी 23 फेब्रुवारी, 2022 पासून 26 मार्च, 2022 पर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. आगामी हंगामात पुरुष आणि महिला गटातील वेगवेगळ्या वयोगटात एकूण 2127 देशांतर्गत सामने रंगणार आहेत.
खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा याच्या खबरदारीसह देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा घेतल्या जातील, असा विश्वास बीसीसीआयने व्यक्त केलाय. कोरोनाच्या संकटात मागील वर्षी रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्यात आली होती. विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या मर्यादित षटकांची स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेनंतर बीसीसीआयने इंग्लंड विरुद्ध टी-20, वनडे आणि कसोटी मालिका यशस्वीपणे पार पाडली. त्यानंतर देशात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बायो बबलच्या कवचामध्ये सुरु असलेली आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली. या स्पर्धेतील उर्वरित सामने आता युएईच्या मैदानात घेण्यात येणार आहेत. एवढेच नाही तर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धाही युएई आणि ओमन येथे शिफ्ट झालीये. त्यामुळे भारतीय देशांतर्गत क्रिकेटचे काय होणार? असा मोठा प्रश्न होता. यासंदर्भात बीसीसीआयने सकारात्मक विचार करुन स्पर्धेचे नियोजन निश्चित केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.