Team India: बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा! निवडकर्त्यांनी या खेळाडूंना दिला डच्चू

भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध तीन टी-20 आणि तितकेच एकदिवसीय सामने खेळणार
India Tour Of Bangladesh
India Tour Of Bangladesh
Updated on

India Tour Of Bangladesh : भारतीय क्रिकेट बोर्डाने बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज रेणुका सिंग आणि यष्टिरक्षक रिचा घोष यांचा 18 सदस्यीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. भारताचा बांगलादेश दौरा 9 जुलैपासून सुरू होणार आहे. (BCCI Announced India Women Team For Bangladesh Tour)

India Tour Of Bangladesh
World Cup Qualifiers 2023: वर्ल्ड कपसाठी श्रीलंका पात्र, 12 वर्षांनंतर वानखेडेवर भारताशी भिडणार

वेगवान गोलंदाज रेणुका सिंग आणि यष्टिरक्षक रिचा घोष यांच्याशिवाय युवा ऑफस्पिनर श्रेयंका पाटीलकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध तीन टी-20 आणि तितकेच एकदिवसीय सामने खेळणार आहे.

India Tour Of Bangladesh
ENG vs AUS: कर्णधार स्टोक्सची अपयशी झुंज! क्रिकेटच्या पंढरीत ऑस्ट्रेलियाची बाजी

सर्व सहा सामने मीरपूर येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे खेळले जातील. हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करणार आहे, तर स्मृती मानधना उपकर्णधार आहे. यष्टिरक्षक फलंदाज घोषची हकालपट्टी आश्चर्यकारक आहे. याचे कारणही देण्यात आलेले नाही.

  • भारतीय टी-20 संघ : हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री (विकेटकीपर), अमनजोत कौर, एस मेघना, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, अंजली सरवानी , मोनिका पटेल, राशी कनोजिया, अनुषा बरेड्डी, मिन्नू मणी.

  • भारतीय एकदिवसीय संघ : हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री (विकेटकीपर), अमनजोत कौर, प्रिया पुनिया, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, अंजली सरवानी , मोनिका पटेल, राशी कनोजिया, अनुषा बरेड्डी, स्नेह राणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.