आयपीएलमधील ग्राऊंड्समनला बीसीसीआयकडून बक्षीस जाहीर

BCCI announces Rs 1.25 crore prize money for curators and groundsmen of IPL 2022
BCCI announces Rs 1.25 crore prize money for curators and groundsmen of IPL 2022
Updated on

मुंबई : आयपीएलचा 15 वा हंगाम संपला. गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले त्यांना 20 कोटीचे बक्षीसही मिळाले. खेळाडूंवर लाखोंच्या बक्षिसांचा वर्षाव झाला. मात्र लीगमधील 70 सामने चार मैदानावर लिलया पार पाडण्यासाठी राबणाऱ्या त्या हातांच काय झालं? या प्रश्नाचं उत्तर बीसीसीआय (BCCI) सचिव जय शहा यांनी दिलं आहे. (BCCI announces Rs 1.25 crore prize money for curators and groundsmen of IPL 2022)

जय शहा यांनी बीसीसीआयने आयपीएलमध्ये राबणाऱ्या ग्राऊंड्समनसाठी देखील बक्षिसाची घोषणा केली आहे. वानेखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, डी. वाय. पाटील स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावरील ग्राऊंड्समन आणि पीच क्युरेटर्सना प्रत्येकी 25 लाख बक्षीस देण्याची घोषणा जय शहा यांनी केली आहे. तर इडन गार्डन आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवरील ग्राऊंड्समन आणि क्युरेटर्सना 12 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

BCCI announces Rs 1.25 crore prize money for curators and groundsmen of IPL 2022
इंग्लडच्या दोन महिला क्रिकेटपटूंनी बांधली लग्नगाठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.