नवी दिल्ली : असेल आयपीएल, त्यातून काही जण होत असतील धनवान; पण कसोटी क्रिकेट हेच सर्वोत्तम आहे आणि त्यात तुम्ही खेळत असाल आणि मोसमात अधिकाधिक सामने खेळाल तर तुम्हीही तेवढेच मालामाल होण्याची भरघोस आणि मोठी वाढ बीसीसीआयने केली आहे.
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ४-१ अशी जिंकल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारतीय कसोटीपटूंचा आनंद अधिक द्विगुणीत केला. सर्वसाधारपणे जो खेळाडू वर्षभरात १० कसोटी सामने खेळेल त्याची तिजोरी ४.५० कोटींनी भरली जाईल. इतकेच नव्हे तर वार्षिक करारातील रक्कमही त्याला मिळणार आहे. ही योजना बीसीसीआयने २०२२-२३ या वर्षापासून सुरू केली आहे.
मोसमात साधारणतः भारतीय संघ कमीत कमी नऊ कसोटी सामने खेळेल, असा अंदाज बांधून ही रचना तयार करण्यात आली आहे. त्यानुसार अर्धे सामने म्हणजेच चार सामने खेळणाऱ्या खेळाडूला सध्या असलेलीच रक्कम मिळेल.
(अंतिम ११ खेळाडू : प्रत्येकी १५ आणि राखीव : ७.५ लाख). मात्र, ५० टक्क्यांहून अधिक सामने खेळले म्हणजेच (पाच किंवा सहा सामने) तर हीच रक्कम दुप्पट होईल म्हणजेच (अंतिम ११ खेळाडू : प्रत्येकी ३० लाख आणि राखीव : १५ लाख). मात्र, सात किंवा त्याहून अधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूला ४५ लाख प्रति सामना आणि राखीव खेळाडूंना २२.५ लाख प्रति सामना मिळणार आहे.
आतापर्यंत कसोटीच अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळवणाऱ्या खेळाडूला १५ लाख तर राखीव खेळाडूला ७.५ लाख मिळत होते.
कोट्यवधी रुपयांचे आयपीएल करार हातामध्ये असल्यामुळे ईशान किशन, श्रेयस अय्यर आणि दीपक चहरसारखे खेळाडू रणजी क्रिकेटला प्राधान्य देत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.