BCCI Partner: भारतीय क्रिकेटमध्ये SBI ची एंट्री, BCCIला मिळणार 47 कोटी रुपये, जाणून घ्या कसे

BCCI, SBI Official Partner: या करारानंतर बीसीसीआयला मोठा फायदा होणार आहे.
BCCI announces SBI Life as official partner for 2023-26 Season
BCCI announces SBI Life as official partner for 2023-26 Season Sakal
Updated on

BCCI, SBI Official Partner: BCCI ने अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडियाची विमा कंपनी SBI Life ला 2023-26 या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हंगामासाठी अधिकृत भागीदार म्हणून घोषित केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लाईफने BCCI सोबत तीन वर्षांचा करार केला आहे.

त्यांची भागीदारी 22 सप्टेंबर 2023 पासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपासून सुरू होईल. यासोबतच भारताने 2023 च्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची जर्सीही लाँच केली आहे.

या करारानंतर बीसीसीआयला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. देशातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक SBI लाइफ पुढील तीन वर्षांसाठी BCCI ला प्रति सामन्यासाठी 85 लाख रुपये देईल.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

विमा कंपनीसोबतचा हा करार शुक्रवारी मोहाली येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यापासून सुरू झाला आहे.

एसबीआय लाईफसोबतचा करार बीसीसीआयने 20 सप्टेंबर रोजी जाहीर केला होता. या तीन वर्षांच्या करारामध्ये एकूण 56 खेळांचा समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारे बीसीसीआयला या कराराअंतर्गत 47.6 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे.

BCCI announces SBI Life as official partner for 2023-26 Season
HDFC Bank: देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेला 4 दिवसांत 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान, काय आहे कारण?

कराराची घोषणा करताना, BCCI सचिव जय शाह म्हणाले, आम्हाला पुढील तीन वर्षांसाठी BCCI देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हंगामांसाठी अधिकृत भागीदार म्हणून SBI Life चे स्वागत करताना आनंद होत आहे.

BCCI announces SBI Life as official partner for 2023-26 Season
Farmer Cost: वाढती मजुरी आणि महागड्या खतांमुळे 55 टक्के शेतकरी हैराण! अहवालात धक्कादायक माहिती

चेअरमन रॉजर बिन्नी म्हणाले, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट दोन्हींसाठी BCCI चे अधिकृत भागीदार म्हणून SBI Life सोबतची आमची भागीदारी जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. एसबीआय लाइफ विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे आणि आम्ही भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी एक मजबूत भागीदारी निर्माण करण्यास उत्सुक आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.