BCCI Apex Council Meeting : बैठक संपली! द्विशतक ठोकूनही रहाणेला डच्चू; स्कायला मात्र बढती?

BCCI Apex Council Meeting
BCCI Apex Council Meeting esakal
Updated on

BCCI Apex Council Meeting : बीसीसीआयची बहुप्रतिक्षीत अॅपेक्स काऊन्सिलची बैठक अखेर संपली. या बैठकीत प्रामुख्याने केंद्रीय करारावर जास्त चर्चा झाली. भारताचा 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादवला बढती मिळाली आहे. तर कसोटी संघातून स्थान गमावलेल्या अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा आणि मयांक अग्रवालला केंद्रीय करारातून डच्चू मिळाला आहे. या तिघांनाही केंद्रीय करारातून वगळ्यात येणार आहे.

BCCI Apex Council Meeting
Ranji Trophy : रणजी ट्रॉफीतही दोन दिवसात खेळ खल्लास! दोन सामने संपले दोन दिवसात

भारतीय टी 20 संघाची धुरा रोहितच्या खांद्यावरून हार्दिक पांड्या आपल्या खांद्यावर घेण्यास सज्ज झाला आहे. मात्र त्यापूर्वी त्याचे केंद्रीय करारात अपग्रेडेशन होणे गरजेचे होते. सध्या हार्दिक केंद्रीय कराराच्या ग्रुप C मध्ये आहे. त्याला आता ग्रुप B मध्ये प्रमोशन मिळणार आहे. दुसरीकडे भारताचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे, इशांत किशन, वृद्धीमान सहा यांना केंद्रीय कराराच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला माहिती दिली. ते म्हणाले, 'सूर्यकुमार हा ग्रुप C मध्ये समाविष्ट आहे. मात्र त्याची गेल्या वर्षीभारत झालेली कामगिरी पाहता त्याला प्रेमोशन मिळार आहे. त्याला ग्रुप A मध्ये जर प्रेमोट करता आले नाही तरी ग्रुप B मध्ये नक्की प्रमोट करण्यात येईल. तो सध्या आयसीसी टी 20 रँकिंगमधील अव्वल स्थानावर असलेला खेळाडू आहे. तसेच वनडे संघात देखील त्याची प्रबळ दावेदारी आहे.'

BCCI Apex Council Meeting
KL Rahul : टीम इंडियाला मोठा धक्का; रोहित पाठोपाठ कर्णधार राहुल देखील बाहेर?

दुसरीकडे शुभमन गिल हा भारताकडून दोन फॉरमॅटमध्ये खेळतो. तो सध्या ग्रुप C मध्ये आहे. त्याला देखील ग्रुप B मध्ये बढती मिळू शकते. इशान किशनला देखली केंद्रीय करारात समाविष्ट करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच केएल राहुलला देखील A+ ग्रेड मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.