वर्ल्ड कपच्या मध्येच BCCI ची मोठी कारवाई, 'या' खेळाडूवर घातली 2 वर्षांची बंदी, जाणून घ्या कारण

BCCI bans Jammu and Kashmir Cricketer Vanshaj Sharma
BCCI bans Jammu and Kashmir Cricketer Vanshaj Sharma
Updated on

BCCI bans Jammu and Kashmir Cricketer Vanshaj Sharma : टीम इंडिया 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करत आहे. या स्पर्धेत अद्याप एकाही पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही. या सगळ्या दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठी कारवाई केली आहे.

बीसीसीआयने एका खेळाडूवर 2 वर्षांची बंदी घातली आहे. या क्रिकेटपटूवर वेगवेगळ्या तारखांचे जन्म प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप आहे. अशा परिस्थितीत आता हा खेळाडू दोन वर्षे बीसीसीआयच्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.

BCCI bans Jammu and Kashmir Cricketer Vanshaj Sharma
Rishabh Pant : टीम इंडियाचा ढाण्या वाघ आला रे...! 'या' मालिकेतून करणार पुनरागमन

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जम्मू-काश्मीरचा क्रिकेटपटू वंशज शर्मावर अनेक जन्म प्रमाणपत्रे सादर केल्याबद्दल बंदी घातली आहे. जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जम्मूचा क्रिकेटपटू वंशज शर्मावर वेगवेगळ्या जन्मतारीखांसह अनेक जन्म प्रमाणपत्रे सादर केल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दोन वर्षांची बंदी घातली आहे. या कालावधीत तो बीसीसीआयच्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.

BCCI bans Jammu and Kashmir Cricketer Vanshaj Sharma
IND Vs ENG Weather Report: भारत-इंग्लंड सामन्याची मजा पाऊस करणार खराब? जाणून घ्या कसे असेल लखनऊमध्ये हवामान

वशंजा शर्मावर 27 ऑक्टोबरपासून बंदी घालण्यास आली आहे. दोन वर्षांच्या बंदीनंतरच तो कोणत्याही स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकेल. वंशज शर्मा या कालावधीत कोणत्याही वयोगटातील स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. याचा अर्थ 2 वर्षांच्या बंदीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच तो वरिष्ठ पुरुषांच्या बीसीसीआय टूर्नामेंटमध्ये सहभागी होऊ शकतो.

भारतीय खेळांमध्ये खेळाडूंच्या वयात फेरफार ही एक मोठी समस्या आहे आणि बीसीसीआयसह अनेक राष्ट्रीय क्रीडा संघटनांनी अलीकडेच अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.