BCCI Central Contracts 2022-23 Team India : भारतीय क्रिकेट संघातून बाहेर पडलेल्या दोन गोलंदाज तर एक फलंदाजाची कारकीर्द आता संपल्याचे मानले जात आहे. बीसीसीआयने रविवारी 26 मार्चला वार्षिक करार जाहीर केला. या यादीत अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली, तर काही ज्येष्ठ खेळाडूंची नावे वगळण्यात आली. बीसीसीआयने जाहीर केलेल्या यादीत गोलंदाज अजिंक्य रहाणे, भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा यांच्या नावाचा समावेश नाही.
बीसीसीआयने काल खेळाडूंच्या वार्षिक कराराची यादी जाहीर केली, या यादीत अनेक ज्येष्ठ खेळाडू स्थान देण्यात आले नाही, तर काही युवा खेळाडूंना त्यांच्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसह रवींद्र जडेजाला A+ श्रेणीत स्थान मिळाले आहे. हार्दिक पांड्यानेही क श्रेणीतून अ मध्ये स्थान मिळवले आहे.
बीसीसीआयच्या नुकत्याच जाहीर झालेल्या वार्षिक करारांपैकी वरिष्ठांचे नाव चर्चेत आहे. यापूर्वी त्यांना क श्रेणीत स्थान देण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपासून केवळ कसोटी संघाचा भाग असलेल्या इशांत शर्माला यावेळी कराराबाहेर ठेवण्यात आले आहे. अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा याआधी बी ग्रेडमध्ये होते. यावेळी दोघांनाही केंद्रीय करारातून वगळण्यात आले आहे. त्याचवेळी दुखापतीमुळे केवळ टी-20 संघाचा भाग असलेला दुसरा गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाही बाहेर ठेवण्यात आले आहे.
A+ ग्रेड - रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.
A ग्रेड - हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल.
B ग्रेड - चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल.
C ग्रेड - उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, इशान किशन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग आणि केएस भरत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.