BCCI : घराणेशाही फक्त राजकारणात नाही तर क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील आहे. सध्याच्या मॉडर्न क्रिकेटमध्ये सर्वांना समान संधी मिळताना दिसतो मात्र मैदानावरच्या समान संधी असोसिएशन मध्ये दिसत नाही. भारतीय क्रिकेट बोर्डच्या परंपरेनुसार हे खरे आहे. क्रिकेटच्या असोसिएशन आपल्या प्रभावशाली वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणारे खुप मुल आहे. बीसीसीआयच्या 38 पूर्ण सदस्यांपैकी 16 सदस्य माजी अधिकार्यांचे आणि शक्तिशाली राजकारण्यांचे मुल किंवा नातेवाईक आहे जे बापाचं बोट धरून असोसिएशन मध्ये घुसले आहे. (Bcci Cricket Association Management Body)
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मुलगा महाआर्यमन सिंधिया यांची महिन्यापुर्वी ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनच्या(Gwalior Division Cricket Association) उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बीसीसीआयने 2016 मध्ये नवीन संविधान तयार केले आहे. त्या अधोरेखित असे आहे की काही राज्यांमध्ये सर्व सदस्य काही कुटुंबातील किंवा एकाच कुटुंबातील आहे. क्रिकेटवरील नियंत्रण ज्यामुळे काही लोकांच्या हातात आहे. यात असोसिएशन प्रशासकांसाठी वयाची मर्यादा, 70 वर्षे आणि सहा वर्षांच्या मुदतीनंतर तीन वर्षांची शीतलकता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे काही वडिलांना त्यांच्या मुलांकडे आपला कारभार सोपवण्याचा स्टेज तयार केला आहे.
जय शाह : बीसीसीआय सचिव, माजी गुजरात क्रिकेट असोसिएशन सह-सचिव.
वडील : अमित शहा माजी GCA अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री.
अरुण धुमाळ : बीसीसीआय कोषाध्यक्ष.
भाऊ : अनुराग ठाकूर, माजी BCCI अध्यक्ष आणि केंद्रीय I&B आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री.
महाआर्यमन सिंधिया : ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशन (GDCA) उपाध्यक्ष.
वडील : ज्योतिरादित्य सिंधिया, माजी अध्यक्ष, एमपी क्रिकेट असोसिएशन; अध्यक्ष, चंबळ डिव्हिजन क्रिकेट असोसिएशन.
धनराज नाथवानी : गुजरात क्रिकेट असोसिएशन (GCA) उपाध्यक्ष.
वडील : परिमल नाथवानी, माजी GCA उपाध्यक्ष.
प्रणव अमीन : बडोदा क्रिकेट असोसिएशन (BCA) अध्यक्ष.
वडील : चिरायू अमीन, माजी बीसीए अध्यक्ष आणि माजी अंतरिम आयपीएल अध्यक्ष.
अजित लेले : बडोदा क्रिकेट असोसिएशन (BCA) सचिव.
वडील : स्वर्गीय जयवंत लेले, माजी BCA आणि BCCI सचिव
जयदेव शहा : सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (SCA) अध्यक्ष.
वडील : निरंजन शाह, माजी SCA आणि BCCI सचिव.
अविशेक दालमिया : क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) चे अध्यक्ष.
वडील : स्वर्गीय जगमोहन दालमिया, माजी CAB, BCCI, ICC अध्यक्ष.
सौरव गांगुली : बीसीसीआय अध्यक्ष.
भाऊ : स्नेहशिष गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचे मानद सचिव आहे.
काका : देबाशिष गांगुली खजिनदार आहेत. बीसीसीआयमध्ये पदोन्नती होण्यापूर्वी गांगुलीने CAB मध्ये सचिव आणि अध्यक्षपदे भूषवली होती.
रोहन जेटली : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष.
वडील : स्वर्गीय अरुण जेटली, माजी DDCA अध्यक्ष, IPL गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
अद्वैत मनोहर : विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) अध्यक्ष.
वडील : शशांक मनोहर, माजी VCA, BCCI, ICC अध्यक्ष.
संजय बेहरा : ओडिशा क्रिकेट असोसिएशन (ओसीए) सचिव.
वडील : आशीर्बाद बेहरा, माजी OCA सचिव.
माहीम वर्मा : क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंड (CAU) सचिव.
वडील : PC वर्मा, माजी CAU सचिव.
निधिपति सिंहानिया जेके ग्रुप : यूपी क्रिकेट असोसिएशन (UPCA) अध्यक्ष.
काका : दिवंगत यदुपती सिंघानिया, यूपीसीएचे माजी अध्यक्ष.
विपुल फडके : गोवा क्रिकेट असोसिएशन (GCA) सचिव.
वडील: विनोद फडके, माजी GCA सचिव.
केचांगुली रिओ : नागालँड क्रिकेट असोसिएशन (NCA) अध्यक्ष.
वडील : नेफियू रिओ, माजी NCA अध्यक्ष आणि नागालँडचे मुख्यमंत्री.
निवड हे प्रत्येक युनिटमध्ये निवडणुकीद्वारे असते पण ते फक्त कागदावरच आहे. जेणेकरून असोसिएशनमध्ये वर्षानुवर्षे युनिटमधील सर्व महत्त्वाच्या नियुक्त्यांवर निर्णय जिल्हा क्लब किंवा वैयक्तिक सदस्यांमधील मतदारांवर करता येईल. बहुतेक युनिट्स खाजगी क्लबप्रमाणे चालवल्या जात आहे. त्यात कोणत्याही बाहेरील व्यक्तीला आत जाणे कठीण आहे.
राजकारण्यांचे शक्तिशाली मुल किंवा नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, तेव्हा कधी जुन्या घराणेशाहीला मार्ग काढावा लागला. उदाहरणार्थ राजस्थानचे काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत हे राज्यातील क्रिकेटचे प्रभारी आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांची अध्यक्षपदी (ग्वाल्हेर) निवड झाली पण त्यांनी नकार दिला आणि नंतर त्यांनी ते पद महाआर्यमन यांना उपाध्यक्ष म्हणून देण्यात आले.
BCCIचे सचिव होण्यापूर्वी जय शाह गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव होते. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (SCA) चे माजी रणजी कर्णधार जयदेव शाह अध्यक्ष आहे. त्यांचे वडील निरंजन शाह चार दशके SC सचिव होते आणि बीसीसीआयमध्ये पद तेच सांभाळत होते.
निरंजन शहा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत सावध भूमिका घेतली. निवडणुकीला उभे राहण्यापासून कोण रोखूणार? एखादी व्यक्ती सक्षम प्रशासक असेल तर त्याला खेळाबद्दल प्रेम असेल तर त्या व्यक्ती एखाद्या माजी अधिकाऱ्याशी संबंधित असेल तर काही फरक पडतो का? लोढा समितीच्या नियमांमुळे मला निवृत्त होईल लागले. पण वर्षानुवर्षे उभारलेली संस्था चुकीच्या हातात जाऊ नये आस वाटत. माझा मुलगा फर्स्ट क्लास क्रिकेटर असून त्याची ते स्वतःची ओळख आहे. असे निरंजन शाह म्हणाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.