MS Dhoni Jersey No 7 : बीसीसीआयचा धोनीच्या जर्सी क्रमांक 7 बाबत मोठा निर्णय; खेळाडूंना दिली सुचना

Dhoni's era of 'jersey number 7' is over; An unprecedented honour from the BCCI
MS DHONI
MS DHONIeSakal
Updated on

MS Dhoni Jersey No 7 : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची जर्सी ही जगभरात प्रसिद्ध आहे. विविध क्षेत्रातील खेळाडूंनी क्रमांक 7 ची जर्सी प्रसिद्ध केल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटमध्ये देखील या जर्सी क्रमांक 7 च्या भोवती एक दिग्गजत्वाचं वलय निर्माण केलं. आता बीसीसीआयने या जर्सी क्रमांक 7 बद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे.

धोनीचा जर्सी क्रमांक 7 आता निवृत्त होत आहे. बीसीसीआयने खेळाडूंना त्यांचा जर्सी क्रमांक निवडताना तो 7 निवडू नये अशी सुचना केली आहे. बीसीसीआयने हा निर्णय धोनीने भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्याच्या सन्मानार्थ हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

MS DHONI
IND vs SA 3rd T20I : यशस्वी जैस्वालच्या चुकीमुळे शुभमन गिल झाला आऊट, कोच द्रविड राग अनावर... Video Viral

भारतीय क्रिकेट बोर्डाने सचिन तेंडुलकरचा जर्सी क्रमांक 10 हा देखील यापूर्वीच निवृत्त केला आहे. आता धोनीचा जर्सी क्रमांक 7 देखील निवृत्त करून धोनीच्या एकमेवाद्वितीयत्वावर शिक्कमोर्तब केलं.

इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले असून आता कोणताही भारतीय क्रिकेटपटू जर्सी क्रमांक 7 परिधान करू शकणार नाही.

बीसीसीआय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'सध्याच्या घडीला भारतीय संघातील खेळाडू जवळपास 60 क्रमांक वापरत आहे. जरी एखादा खेळाडू वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ संघाबाहेर असला तरी त्याचा जर्सी क्रमांक दुसऱ्या नव्या खेळाडूला दिला जात नाही. त्यामुळे नव्या खेळाडूंना फक्त 30 क्रमांकातूनच नंबर निवडायचा असतो.'

MS DHONI
Suryakumar Yadav : सूर्यकुमारच्या झंझावाती शतकामुळे विजय

जर्सी क्रमांक 10 आणि जर्सी क्रमांक 7 याबाबत फुटबॉल पाठोपाठ क्रिकेटमध्ये देखील मोठी क्रेज पहायला मिळते. फुटबॉलमध्ये सध्या खेळत असलेल्या लिओनेल मेस्सीचा जर्सी क्रमांक हा 10 आहे तर ख्रिस्तियानो रोनाल्डोचा जर्सी क्रमांक हा 7 आहे. यापूर्वी झिदान, ब्राझीलचा रोनाल्डिन्हो यांनी देखील जर्सी क्रमांक 10 होता.

इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू डेव्हिड बेकहमचा देखील जर्सी क्रमांक हा 7 होता. त्यानेच या जर्सी क्रमांकाला ग्लॅमर मिळवून दिलं होतं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.