Sourav Ganguly : पॉटिंगच्या राज्यात आता दादागिरी! दिल्लीसोबत सौरवची जुनीच इनिंग नव्याने होणार सुरू

Sourav Ganguly Delhi Capitals
Sourav Ganguly Delhi Capitalsesakal
Updated on

Sourav Ganguly Delhi Capitals : बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली सध्या काय करतो असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. आता नव्या वर्षात सौरभ गांगुली एका वेगळ्या रूपात क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. दादाला दिल्ली कॅपिटल्सचा जुना जॉब परत मिळाला आहे. आता तो दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेट संचालक म्हणून आयपीएल 2023 मध्ये दिसणार आहे. याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sourav Ganguly Delhi Capitals
Babar Azam : दिवस फिरले! कसोटीत धावबाद होणारा बाबर ठरला चेष्टेचा विषय

पीटीआयच्या आयपीएल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्स सौरव गांगुलीला क्रिकेट संचालक पदी नियुक्ती देणार आहे. यापूर्वी सौरव गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्षपद भुषवले होते. मात्र त्याला दुसरी टर्म नाकारण्यात आली होती. यावेळी बरेच वादही निर्माण झाले होते. याचदरम्यान, सौरव गांगुलीला आयपीएलचे चेअरमनपदाची देखील ऑफर दिली होती. मात्र बीसीसीआयमध्ये सर्वोच्च पद भुषवल्यानंतर सैरवने आयपीएल काऊन्सिलचा चेअरमन होण्यास नकार दिला होता. (Sports Latest News)

Sourav Ganguly Delhi Capitals
Virat Kohli : सामान्य कामगिरी! विराट कोहली बाबत आईसलँड क्रिकेटचे वादग्रस्त ट्विट

बीसीसीआय अध्यक्ष पदाचा ऑक्टोबर 2022 मध्ये राजीनामा दिल्यानंतर गांगुली आता दिल्ली कॅपिटल्ससोबत जोडला जाणार आहे. तो आयपीएलबरोबरच आंतरराष्ट्रीय टी 20 लीगमधील फ्रेंचायजींच्या दुबई कॅपिटल्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांचे देखील कामगात पाहणार आहे. आयपीएल सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सौरव गांगुली या वर्षी दिल्ली कॅपिटल्समध्ये परतणार आहे. त्याच्यात आणि फ्रेंचायजीमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.