BCCI Impact Player : मुश्ताक अली राष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत आयपीएलच्या धर्तीवरचा इम्पॅक्ट खेळाडू नियम लागू करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या अपेक्स कॉन्सिलने घेतला आहे. १६ ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होत आहे.
गत मुश्ताक अली स्पर्धेतही इम्पॅक्ट खेळाडूचा नियम होता; परंतु हा खेळाडू १४ षटकांच्या आत मैदानावर आणला जात होता आणि तो खेळाडू कोण असणार, हे नाणेफेकीच्या वेळी जाहीर करणे गरजेचे होते.
आयपीएलमध्ये मात्र या नियमात काही बदल करण्यात आले. नाणेफेकीच्या अगोदर चार राखीव खेळाडू जाहीर करावे लागायचे, यातील एक खेळाडू इम्पॅक्ट खेळाडू म्हणून सामन्याच्या कोणत्याही वेळेस मैदानात उतरवण्यात येत होता. हाच सुधारित नियम आता मुश्ताक अली राष्ट्रीय-२० मध्ये वापरण्यात येणार आहे.
आयपीएलमध्ये इम्पॅक्ट खेळाडू वापरणे बंधनकारक नव्हते. मुश्ताक अली स्पर्धेतही तसेच असेल.आयपीएल-मधील या इम्पॅक्ट खेळाडूच्या निर्णयावर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी टीका केली होती. इम्पॅक्ट खेळाडूमुळे अष्टपैलू खेळाडूचे महत्त्व कमी होईल.
एखादा खेळाडू जो केवळ चांगली फलंदाजीही करू शकतो किंवा निव्वळ गोलंदाज म्हणून संघात खेळू शकतो, अशाच अष्टपैलू खेळाडूंनाच संघात स्थान मिळेल; परंतु आता सातव्या, आठव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल किंवा दोन षटके गोलंदाजी करू शकेल, अशा अष्टपैलूंचे महत्त्व कमी होईल, असे पाँटिंग म्हणाले होते.
आशिया स्पर्धेत युवांना संधी
हांगझोऊ येथे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया क्रीडा स्पर्धेत पुरुष आणि महिला संघ पाठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बीसीसीआयच्या अपेक्स कॉन्सिलने घेतला आहे. या स्पर्धेत पुरुषांचे क्रिकेट सामने २८ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
आशिया क्रीडा स्पर्धेत पुरुषांचा संघ पाठवण्याची बीसीसीआयची पहिलीच वेळ असणार आहे. प्रमुख खेळाडू विश्वकरंडक स्पर्धेची तयारी करणार असल्यामुळे या आशिया क्रीडा स्पर्धेसाठी नवोदित खेळाडूंचा संघ पाठवण्यात येणार आहे. महिलाच्या स्पर्धा १९ सप्टेंबरपासून सरू होणार आहे. त्यासाठी मात्र मुख्य संघ पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
भरगच्च कार्यक्रमामुळे आशिया क्रीडा स्पर्धेसाठी मुख्य संघ पाठवणे शक्य होणार नाही; परंतु आशिया क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीयत्वासाठी जेथे सुवर्णपदकाचे मोल अधिक असते. त्यामुळे तेथे संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.