भारतीय खेळाडूंचा परदेशी टी-20 लीग खेळण्याचा मार्ग मोकळा?

आयपीएल संघांनी बीसीसीआयला भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्याचीय...
bcci likely to allow indian cricketers to participate foreign t20 leagues cricket
bcci likely to allow indian cricketers to participate foreign t20 leagues cricketsakal
Updated on

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ परदेशी टी-20 लीग खेळण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंना परवानगी देऊ शकते. क्रिकेटबोर्ड आता भारतीय खेळाडूंना दिलासा देण्याच्या विचारात आहे. आयपीएलच्या परदेशात वाढत्या प्रभावामुळे भारतीय खेळाडूंना परवानगी देण्याची मागणी वाढली आहे.

दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये अलीकडेच सहा आयपीएल फ्रँचायझींनी संघ विकत घेतले आहेत. आयपीएल फ्रँचायझींच्या दबावाखाली बीसीसीआय आता भारतीय खेळाडूंना परदेशी फ्रेंचायझी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्याचा विचार करत आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बीसीसीआयच्या एजीएममध्ये याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

bcci likely to allow indian cricketers to participate foreign t20 leagues cricket
Dewald Brevis : मुंबई इंडियन्सच्या बेबी एबीचा इंग्लंडमध्ये धमाका; चोपल्या 49 चेंडूत 112 धावा

बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, परदेशात लीग असल्यामुळे आयपीएल संघांनी बीसीसीआयला भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. परदेशात खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंवर प्रश्न आहे, परंतु कोणताही निर्णय घेण्याआधी आम्हाला एकदा एजीएममध्ये चर्चा करावी लागेल.

bcci likely to allow indian cricketers to participate foreign t20 leagues cricket
Commonwealth Games : 'पहिले सुवर्ण ते सर्वात मोठा संघ', भारताचे 15 माईल स्टोन

भारतीय महिला क्रिकेटपटूंनाच सध्या विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी आहे. याशिवाय काही निवृत्त पुरुष क्रिकेटपटूंनीही परदेशी लीग आणि टूर्नामेंटमध्ये खेळण्याची मुभा आहे. भारतीय खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळल्यास आयपीएलची ओळख नष्ट होईल, असा विश्वास बीसीसीआयला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.